शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

पुणेकरांना पार्किंगसाठी मोजावे लागणार शुल्क

By admin | Updated: March 31, 2017 03:39 IST

शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी करण्याच्या हेतूने महापालिकेकडून नवीन पार्किंग धोरण

पुणे : शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी करण्याच्या हेतूने महापालिकेकडून नवीन पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले आहे. याअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग करण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांना शुल्क मोजावे लागणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. या पार्किंग शुल्कामधून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळावे, असे उद्दिष्ट आगामी अंदाजपत्रकामध्ये निश्चित करण्यात आले असल्याचे कुमार यांनी या वेळी सांगितले.महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे स्थायी समितीसमोर सादरीकरण केल्यानंतर कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर व विभागप्रमुख उपस्थित होते. कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी पार्र्किं ग धोरण निश्चित करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी शुल्क आकारले जाणार आहे. यातून पालिकेला १०० कोटी रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे. या संपूर्ण निधीचा वापर केवळ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केला जाणार आहे. वाहनाने व्यापलेली जागा, पार्किंगची वेळ, दिवस यानुसार हे पार्किंग शुल्क निश्चित केले जाईल.’’(प्रतिनिधी)सार्वजनिक सायकल यंत्रणेसाठी ५० कोटीलंडनच्या धर्तीवर पुणे शहरामध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टिम (सार्वजनिक सायकल यंत्रणा) राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरात ठिकठिकाणी पालिकेकडून नाममात्र दरात भाड्याने सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरात कुठूनही सायकल भाड्याने घेऊन ती कुठेही जमा करण्याची व्यवस्था याअंतर्गत केली जाणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे. त्यामध्ये ५० टक्के नागरिकांकडून खासगी वाहनांचा वापर केला जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमकुवत असल्याने खाजगी वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर मोफत पार्र्किं गमुळे अधिकाधिक वाहने रस्त्यावर येत असल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत.शहरातील रस्ते व सार्वजनिक जागा बेसुमार वाहनांनी व्यापल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.१००कोटी रुपयांचे उत्पन्न पार्र्किं ग शुल्कामधून मिळविण्याचे उद्दिष्ट८०टक्क्यांपर्यंत वाहतूक वापराचे उद्दिष्ट पुणे स्ट्रीट प्रोग्रॅमनागरिकांना रस्त्यांवरून चालणे सहज सुलभ व्हावे यासाठी १०० किमीचे रस्ते परिपूर्ण बनविण्याचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत रस्त्यांवरील पदपथ व सायकल ट्रॅक अद्ययावत केले जाणार आहेत. यासाठी आतापर्यंत ३० किमी लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात जंगली महाराज रस्त्याचे (२ किमी) काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी वाहनांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. सायकल धोरणासाठी १०० कोटीएकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराला ती जुनी ओळख पुन्हा प्राप्त करून देण्याचा चंग प्रशासनाकडून बांधण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून काही दिवसांपूर्वीच सायकल धोरण जाहीर करण्यात आले होते. आगामी वर्षात या सायकल धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात होणार आहे. या सायकल धोरणासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी जुने सायकल ट्रॅक दुरुस्त करून अद्ययावत केले जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन सायकल ट्रॅकची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे.एका वर्षांत ५० हजार घरे बांधणार सर्वांना घर या संकल्पनेअंतर्गत आगामी २०१७-१८ या वर्षामध्ये ५० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, एसआरए व म्हाडा यांच्याशी समन्वय साधून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.आॅनलाइन सेवासुविधांमध्ये वाढमहापालिकेचे कामकाज अधिकाधिक गतिमान होण्यासाठी आॅनलाइन सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) या धोरणांतर्गत पालिकेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. प्रत्येक विभागांचे आॅनलाइन डॅशबोर्ड विकसित केले जाणार आहेत, त्यामुळे एका क्लिकवर त्या विभागाची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.प्रमुख प्रकल्प व प्रस्तावित निधी शाश्वत वाहतूक व्यवस्था; एकूण तरतूद ७०१ कोटी प्रस्तावित कामे रक्कम १) औंध व सातारा रस्ता बीआरटी प्रकल्प१२९२) नवीन बस खरेदी१६४३) पीएमपी डेपो व टर्मिनल विकास३१४) पीएमपी आर्थिक तुटीसाठी मदत१६५५) पदपथ रुंदीकरण३५६) सायकलसाठी पायाभूत व्यवस्था५०७) सार्वजनिक सायकल वितरण व्यवस्था५०८) पार्र्किं ग पॉलिसी, रोड आॅडिट, चौक सुशोभीकरण२५९) एचसीएमटीआर प्रकल्प०२एकूण७०१एकसमान २४ तास पाणीपुरवठा; तरतूद ७६६ कोटीप्रस्तावित कामे रक्कम १) पाण्याची १६०० किमी लांबीची वितरण व्यवस्था, ८२ टाक्या बांधणे४३१२) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र५०३) भामा-आसखेड योजना१५०४) पावसाळी वाहिन्या विकसित करणे८५५) लष्कर बंद पाइपलाइन योजना५०घनकचरा व्यवस्थापन : तरतूद ४०० कोटीप्रस्तावित कामे रक्कम १) राडारोडा प्रक्रिया प्रकल्प५२) अ‍ॅटोमेटिक रोड स्वीपिंग व्हेईकल खरेदी१५३)कचरा व्यवस्थापनासाठी आउटसोर्सिंग५०४) संगणकीकृत कचरा व्यवस्थापन प्रणाली विकास१०५) कचरा प्रकल्प उभारणी१०पर्यावरण व शाश्वत विकास; तरतूद ३३९ कोटीप्रस्तावित कामे रक्कम १) नदीकाठ सौंदर्यीकरण५०२) नदीसुधारणा प्रकल्प२००३) उद्यानांचा विकास करणे३४४) वातावरणाची माहिती संकलन केंद्रे उभारणे ५०५) झाडांची मोजणी करणे ०५