शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुजरातच्या 'बर्फी'वर राहणार एफडीएचे लक्ष : खासगी बस गाड्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:17 IST

राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुजरातहून मोठ्या प्रमाणावर स्पेशल बर्फी येते.

ठळक मुद्देपदार्थांचा दर्जा राखण्याबाबत मिठाई उत्पादकांना आवाहन दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक वातानुकुलित वाहनांतून करणे बंधनकारकतब्बल ३९ लाख ६४ हजार ४१२ रुपयांची ९६,७२२ किलो स्पेशल बर्फी जप्त

पुणे : गणेशोत्सवात निर्भेळ खाद्यान्न आणि मिठाईचे पदार्थ मिळावे यासाठी यंदा गुजरातहून येणाऱ्या स्पेशल बर्फीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष केंद्रीत केले आहे. खासगी बस स्टँडवर एफडीएची पथके पाहणी करीत असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. तसेच, मिठाई उत्पादकांना देखील पदार्थांचा दर्जा राखण्याबरोबरच स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर माव्याच्या पदार्थांचा वापर होतो. खव्याचे मोदक, बर्फी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुजरातहून मोठ्या प्रमाणावर स्पेशल बर्फी येते. नाशवंत असलेली ही बर्फी खासगी ट्रॅव्हल्स बसमधून अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणली जाते. अन्न सुरक्षा मानद कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक वातानुकुलित वाहनांतून करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यात जीवाणूंची निर्मिती होण्याचा धोका असतो. अशा माव्यापासून बनविलेले पदार्र्थ खाण्यास योग्य राहत नाहीत. गेल्या गणेशोत्सवामधे शहरामध्ये गुजरातमधून आलेली तब्बल ३९ लाख ६४ हजार ४१२ रुपयांची ९६,७२२ किलो स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली होती. प्रवासी ट्रॅव्हल्स गाड्यातून या पदार्थांची वाहतूक करण्यात आली होती. एफडीएने हा संपूर्ण साठा जप्त करुन नष्ट केला होता. तसेच, या बफीर्ची वाहतूक करणाºया वाहनाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. या काळात बफीर्चे २१ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील १२ नमुने खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. एफडीएचे सहायक आयुक्त शिंदे म्हणाले, गुजरातहून येणारी स्पेशल बर्फी तीस किलोच्या बॅग्जमधे येते. त्यात दहा-दहा किलोच्या वड्या असतात. त्यावर तुपाचा हात फिरविलेला असतो. प्रवासी वाहनांमधे अस्वच्छ वातावरणात त्याची वाहतूक केली जाते. या पदार्थांची वातानुकुलीत वाहनांतूनच वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. या पदार्थांची प्रवासी वाहनांतून वाहतूक केल्याचे आढळल्यास, ते जप्त करुन नष्ट केले जाते. तसेच, संबंधित वाहनावरही कारवाई केली जाते. ----------------परराज्यातून धोकादायक वातावरणात दुग्धजन्य पदार्थ येऊ नयेत यासाठी खासगी बस स्टँडवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच, मिठाई उत्पादकांना देखील पदार्थांचा दर्जा राखण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. प्रसंगी उत्पादकांच्या दुकानांची देखील तपासणी केली जाईल. संजय शिंदे, सहायक आयुक्त, एफडीए  

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातGanesh Mahotsavगणेश महोत्सवFDAएफडीए