शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना सरबत विक्री करणाऱ्यांवर एफडीएची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:40 IST

उन्हाळ्यामुळे नागरिकांची विविध रसवंती गृहांमध्ये गर्दी हाेते. अनेकदा रसवंती चालकांकडून स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. अश्या दुकानदारांवर एफडीएकडून विशेष माेहिम राबवून कारवाई करण्यात येत अाहे.

ठळक मुद्देविनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर एफडीएची नजरपाच ठिकाणांवर करण्यात आली कारवाई

पुणे : अन्न व अाैषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) परवाना नाेंदणी शिवाय कुठल्याही प्रकारच्या शीतपेयाची विक्री करता येत नाही. परंतु शहरातील अनेक रस्त्यांवर टेबल टाकून विविध सरबतांची विक्री करण्यात येते. अशा सरबत केंद्रांवर एफडीएची नजर असून 6 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत 206 ठिकाणांच्या तपासण्या एफडीए कडून करण्यात अाल्या अाहेत. तसेच पाच ठिकाणांवर कारवाई करुन 21 हजार रुपये दंड वसून करण्यात आला आहे.     उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांकडून थंड पेयांना पसंती देण्यात येते. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यानंतर अापाेअापच नागरिकांची पाऊले रसवंती गृह, आयस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसकडे वळतात. प्रत्येक रसवंती गृह, शेतपेप विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे, तसेच स्वच्छ पाणी वापरने अावश्यक अाहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. एफडीए कडून एक विशेष माेहिम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शहरातील शीतपेयांचे स्टाॅल्स, दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. जेथे स्वच्छता पाळण्यात येत नाही, त्यांच्यावर एफडीएकडून दंडही अाकारण्यात येत आहे. या माेहिमेंतर्गत अात्तापर्यंत 206 तपासण्या करण्यात आल्या असून त्यातील पाच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली अाहे. तसेच 47 ठिकाणचे नमुने गाेळा करण्यात आले अाहेत. त्यात एक रसवंती गृह, अाठ ज्यूस सेंटर, एकाेणतीस आयस्क्रीम, गाेळावाले, चार बर्फाचे कारखाने, व पाच आंबा विक्रेते यांच्याकडील नमुने तापसणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले अाहेत. त्याचबराेबर एफडीए कडून आत्तापर्यंत 9 जणांना परवाने अाणि 34 नाेंदणी दाखले देण्यात आले अाहेत.     महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 नियम व नियमने 2011 अंमलात अालेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक अाहे. विना परवाना अन्न व्यवसायक केल्यास संबंधितांवर फाैजदारी खटला दाखल केला जाताे. तसेच त्यांना 6 महिने कारावास व 5 लाखांपर्यंत दंड हाेऊ शकताे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घेणे अावश्यक अाहे. तसेच नागरिकांनी स्वच्छता पाहूनच रसांचे सेवण करावे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे असे अावाहन एफडीएकडून करण्यात आले अाहे.त्याचबराेबर तपासणी माेहिम संपूर्ण उन्हाळ्यात चालणार असल्याचे एफडीएचे सहाय्यक अायुक्त संपत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीएnewsबातम्या