शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन मोसमात बर्फ तपासणीबाबत एफडीए पडली ‘गार’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:09 IST

एफडीए च्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे गलिच्छ तसेच रोगराईला कारणीभूत ठरणारा बर्फ पुणेकरांच्या पोटात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जंतुमुक्त, जागा स्वच्छ असणे आवश्यकनिवडणुकीच्या कामात अडकल्याने पुढील आठवड्यात शहरातल्या बर्फाची तपासणी करणार : एफडीए

पुणे : ज्या मोसमात बर्फाचा सर्वाधिक वापर होतो त्याच उन्हाळयात बर्फाच्या दर्जाची तपासणी करण्यासंदर्भात प्रशासन थंडगार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. रसवंतीगृहांपासून, विविध हॉटेले, शीतपेयांची दुकाने-हातगाड्या, मंगल कार्यालये आदी सर्वत्र प्रामुख्याने प्यायच्या थंड पाण्यासाठी बर्फांचा वापर सध्या वाढला आहे. मात्र अर्धा उन्हाळा संपला तरी या बर्फाची तपासणी करण्यास अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळ मिळालेला नाही.एफडीए च्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे गलिच्छ तसेच रोगराईला कारणीभूत ठरणारा बर्फ पुणेकरांच्या पोटात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या कामात अडकल्याने पुढील आठवड्यात शहरातल्या बर्फाची तपासणी करणार असल्याचे एफडीए कडून सांगण्यात येत आहे.   बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जंतुमुक्त, स्वच्छ असणे आवश्यक आहे. बर्फ तयार करण्यासाठी वापरली जाणारी जागाही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शहरात दररोज शेकडो टन  बर्फाची मागणी असते. पुण्यात कोंढवा, हिंगणे, पिंपरी तसेच नांदेड सिटी आदी परिसरातील बर्फ उत्पादकांकडून बर्फाचा पुरवठा केला जातो. उद्योगासाठी वा अन्य कारणासाठीचा अखाद्य बर्फ निळ््या रंगाचा आणि खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ रंगहीन असला पाहिजे, असा नियम सरकारने केला आहे. मात्र या सर्वांची काटेकोर तपासणीच सध्या शहरात होत नाही. लिंबू सरबत, कोकम, कैरी पन्हे, उसाचा रस, ताक, लस्सी यासह सर्व प्रकारच्या शीतपेयांमध्ये तसेच मद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बफार्चा वापर होतो. दरवर्षीच्या उन्हाळयात एफडीएकडून बर्फाचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. यंदा या तपासणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे पुणेकरांच्या पोटात कोणत्या दजार्चा बर्फ  जात आहे, याबद्दलची स्पष्टता नाही....

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीए