सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST2021-07-24T04:08:05+5:302021-07-24T04:08:05+5:30

लग्न झाल्यानंतर पती माहेरून सोन्याच्या साखळीसाठी १ लाख १० हजार रुपये घेऊन येण्यास सांगत विवाहितेचा छळ करण्यात येत होता. ...

The father-in-law molested the gold | सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग

लग्न झाल्यानंतर पती माहेरून सोन्याच्या साखळीसाठी १ लाख १० हजार रुपये घेऊन येण्यास सांगत विवाहितेचा छळ करण्यात येत होता. या सोबतच घरातील व शेतातील कामे नीट येत नाहीत, या कारणावरुन वेळोवेळी विवाहितेला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात येत होती. विवाहिता आणि सासू यांचे भांडण झाल्यावर विवाहितेने होणाऱ्या त्रासाविरूद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाते असे म्हणल्यावर सासू व सासऱ्यांनी तिला घरात कोंडून ठेवले होते. विवाहिता आणि सासरे हे बुधवारी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सासऱ्याने विवाहितेला जवळ ओढून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर सुनेने पोलिसांकडे फिर्याद दिली असून आळंदी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The father-in-law molested the gold