शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:59 IST

गुरुवारी २८ मार्च रोजी अवैधरीत्या वाळूउपशाची बातमी करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली आहे.

सांगवी : शिर्सुफळ (ता. बारामती) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती येथे आमरण उपोषण करण्यात आले.यामध्ये बारामती तालुका पत्रकार संघ, पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आदी संस्थांच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

गुरुवारी २८ मार्च रोजी अवैधरीत्या वाळूउपशाची बातमी करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये फिर्यादी महेश बालदत्त आटोळे व केशव शेलार यांना शिवीगाळ करत पिस्तूलाचा धाक दाखवूनकेमरा मोबाईल, ओळखपत्र, पैसे काढून घेऊन त्यांच्याच खिशातील पैसे हातात ठेऊन दबाव टाकत पैसे घेत असल्याबाबतचा व्हिडीओ काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार शिर्सूफळ येथे घडला होता.याबाबत आरोपी गणेश गाढवे, सचिन आटोळे यांच्यासह नऊ जणांविरुध्द बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पत्रकारांच्या विरोधात ही खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केलेला त्वरीत रद्द करा, तलावातील अवैध वाळू उपसा करून गणेश गाढवे, सचिन आटोळे, विठ्ठल गाढवे, दत्तात्रय आटोळे यांच्यावर पर्यावरणाची हानी व वाळू चोरीचा गुन्हा दाखल करावा इतर नऊ आरोपीना त्वरित अटक करावी, शिर्सुफळ गावात वैध वाळू उपसा बंद करण्यासाठी संयुक्त चेक पोस्ट त्वरीत लावावे.यावेळी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्रात राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, भारीप पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगलदास निकाळजे, योगेश महाडिक, कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी विक्रम थोरात, अक्षय शेलार, मयुर कांबळे, चैतन जाधव आदी उपस्थित होते.४सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, आर्मी अ‍ॅक्टचा कलम लावण्यात यावा, या आरोपींना जामीन कसा झाला, याची सखोल खात्या अंतर्गत चौकशी करावी, तपास अधिकारी त्वरित बदलून तपास कार्यक्षम अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा. अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणे