शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:53 IST

कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे.

ठळक मुद्देआदिवासी शेतकरी, आदिवासी विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प

खेड (डेहणे) : खेडच्या पश्चिम भागातील अदिवासी भात उत्पादक शेतकरी आता स्वत:ची ‘धान्य प्रक्रिया’ करणारी कंपनी स्थापन करणार आहेत. या कंपनीची स्थापना व त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दरकवाडी (ता. खेड) येथे आदिवासी शेतकºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही नावीन्यपूर्ण संकल्पना सहायक जिल्हा अधिकारी व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांची असून त्यांनी या बैठकीत आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी शेतकरी, आदिवासी विभाग, घोडेगाव, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कंपनीत जुन्या भात वाणाचे संवर्धन, सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादन, हाताळणी, प्रतवारी व कंपनीच्या ब्रँडवर विक्री होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आयुष प्रसाद यांनी अदिवासी शेतकरी गट स्थापन करून, संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. सेंद्रीय पद्धतीने जुन्या व पारंपारिक भात वाणाच्या उत्पादनासाठी व येणाऱ्यां अडचणींवर मात करण्यासाठी खेड कृषी विभाग तांत्रिक मदत करेल, अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. यावेळी सह्याद्री स्कूलच्या दीपा मोरे यांनी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी आर. बी. बारवे, कृषी पर्यवेक्षक आर. ए. जाधव, कृषी सहायक एस. पी. इंदोरे, एस. बी. रोडे, पी. एन. पवार, डी. जी. डोलारे, एस. के. सुपे, नाईकरे, आदिवासी शेतकरी तुकाराम भोकटे, हरिभाऊ तळपे, मंदा काठे, सुभाष डोळस, किरण वाळुंज, रामदास लांडगे व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :KhedखेडFarmerशेतकरीagricultureशेतीbusinessव्यवसाय