शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 03:14 IST

१५ ते १७ कोटींची वसुली; प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती उघड

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून सुमारे १५ ते १७ कोटी रुपये अतिरिक्त पैसे वसुल केल्याप्रकरणी दोन आडत्यांचे परवाना निलंबित करण्यात आले आहेत. चारपैकी दोन आडत्यांचे परवाना निलंबित केले असले तरी उर्वरित दोन आडत्यांवर कारवाईला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.बाजारातील डाळिंब यार्डातील चार आडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात केली. यात शेतकरी आणि खरेदीदारांची सुमारे १५ ते १७ कोटींची लूट झाल्याचे बाजार समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने मार्केट यार्डातील संशयित आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला. आतापर्यंत ४१ संशयित आडत्यांची दफ्तरे ताब्यात घेतली आहेत. तसेच, दफ्तर तपासणीसाठी खासगी ८ सनदी लेखापालांची (सीए) नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे दफ्तर तपासणी सुरू आहे. आज दोन आडत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. दफ्तर तपासणीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.अंतिम अहवाल लवकरच समोर येणारशेतकरी आणि खरेदीदार यांच्या पट्टीतून अवैध रक्कम कपात केल्याप्रकरणी आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा अंतिम अहवाल लवकरच समोर येईल. अंतिम अहवालात आडत्यांनी शेतकरी आणि खरेदीदार यांची किती अवैध रक्कम कपात केली आणि एकूण आकडा समोर येईल. त्यानंतर संबंधितांना त्यांचे पैसे दिले जातील, असे देशमुख यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी