शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आग लागल्याने शेतकऱ्याचा गोठा जळाला; खेड तालुक्यातील घटना, २ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:17 IST

अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले. 

ठळक मुद्देजनावरांना वाचविण्याची धडपड करीत असताना रौधळ यांनाही बसल्या आगीच्या झळाएका बैलाचा मृत्यू झाला असून गाय आणि आणखी एक बैल भाजला ८० टक्के

चासकमान : अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले. मल्हारी बाजीराव रौधळ (वय ४५) असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. रौधळ यांनी गोठ्यामध्ये जनावरे बांधलेली होती. यासोबतच कडबा, सुका चाराही ठेवलेला होता. संध्याकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये गोठ्यात बांधलेली जनावरे गंभीररित्या भाजली. तर कडबा आणि सुका चाराही जळून खाक झाला. जनावरांना वाचविण्याची धडपड करीत असताना रौधळ यांनाही आगीच्या झळा बसल्या. आगीची घटना समजताच ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. एका बैलाचा मृत्यू झाला असून गाय आणि आणखी एक बैल ८० टक्के भाजला आहे. घटनेचा पंचनामा तलाठी शेख, पोलीस पाटील अरुण पवार, कोतवाल उत्तम कुडेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोखरकर यांच्या पथकाने केला. यावेळी माजी सरपंच संजय रौंधळ, उपसरपंच सत्यवान पानमंद, माजी उपसरपंच अजित कुटे, बाळासाहेब पिंगळे, मारुती रौंधळ, साहेबराव जाधव उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भेट देऊन लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी रौंधळ यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी मदत गोळा केली असून ही मदत अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेड