शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आंबेगावचा शेतकरी आर्थिक अडचणीत, उभ्या पिकात सोडल्या शेळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:19 IST

आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे; परंतु टोमॅटो पिकासाठी झालेला खर्चही सुटत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अवसरी - आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे; परंतु टोमॅटो पिकासाठी झालेला खर्चही सुटत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकºयांनी पिकविलेल्या कोणत्याच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून घोड नदी व डिंभे उजवा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी आदी गावांतील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात.तालुक्याला २५ ते ३० वर्षांपासून उन्हाळा टोमॅटो पिकाची लागवड करीत असतात.पूर्वी आंबेगाव तालुक्यात शेतकºयांच्या बांधावर येऊन पंजाब, दिल्ली येथील टोमॅटो व्यापारी टोमॅटो खरेदी करीत असत. त्या वेळी टोमॅटोच्या २० किलो वजनाच्या पेटीला एक हजार ते बाराशे रुपये इतका बाजारभाव मिळत असे; परंतु सात ते आठ वर्षांपासून नारायणगाव येथे कृषी उत्पन्न बाजर समितीच्या जागेत टोमॅटो खरेदी-विक्रीचे व्यवहार चालु झाले तेव्हापासून दिल्ली व पंजाब येथील टोमॅटो व्यापारी आंबेगाव तालुक्यात येण्याचे बंद झाले.-तालुक्यातील शेतकरी फेबु्रवारीत टोमॅटोरोपांची लागवड करतात व एप्रिल व मे महिन्यात टोमॅटो विक्रीसाठी तयार होतात. तालुक्यातील अवसरी, निरगुडस, पारगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, शिंगवे आदी गावांतील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु, शेतकºयांनी केलेला खर्च वसूल होत नसल्याने टोमॅटोपिकात मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.- सध्या नारायणगाव येथे २० किलो वजनाच्या कॅरेटला १०० रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने वाहतूक, टोमॅटो तोडणीचा खर्चही सुटत नसल्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे टोमॅटो बागायत शेतकरी सांगत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती