शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 05:18 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले.

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडेबाजार सुरू केले आहेत. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करीत आहेत, त्यामुळे शेतकरी आठवडेबाजाराचा ‘बाजार उठला’ असल्याचे सध्याचे चित्र आहे.शेतकºयांना स्वत:ची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी; तसेच व्यापाºयांना कमी दराने भाजीपाल्याची विक्री न करता शेतकºयांचे लहान-मोठे गट स्थापन करून शेतीमालाची विक्री करता यावी, या हेतूने शहरातील विविध भागांत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाच्या मान्यतेने आठवडेबाजार सुरू करण्यात आले. आठवडेबाजारात भाजीपाला विक्रीस बसणाºया विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडेबाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. काहीही न करता पैसे कमावता येत असल्याने बाजार चालवण्यास मिळावा, यावरून चढाओढ लागली आहे.पणन विभागाच्या परवानगीशिवाय एकही शेतकरी आठवडेबाजार सुरू करता येत नाही. मात्र, पणन विभाग आणि पालिकेला विचारात न घेता थेट शेतकरी आठवडेबाजार थाटून त्यातून पैसा कमावला जात आहे. पालिकेने आपल्या हद्दीत सुरू झालेल्या आठवडेबाजारावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिकाºयांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.नियमानुसार शेतकरी आठवडेबाजाराचे आयोजन करण्याची परवानगी मिळालेल्या बाजार आयोजक कंपन्यांना काही नगरसेवकांनी हुसकावून लावले असल्याची माहिती समोर येत आहे. पणन विभागकडूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पणन विभागाच्या परवानगीने सुरू झालेल्या बाजारात विक्रीसाठी येणाºया प्रत्येक विक्रेत्याची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. व्यापाºयांना या बाजारात थारा मिळत नाही. मात्र, अनेक नगरसेवकांनी आठवडेबाजारांवर नियंत्रण प्रस्थापित करून शेतकरी आठवडेबाजाराच्या उद्देशाला हरताळ फासला आहे.महापालिका आणि पणन विभाग यांच्यात अद्याप शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत सुमारे १२० आठवडेबाजार बेकायदेशीरपणे सुरू झाले. कोथरूड, बाणेर आणि पिंपळे सौदागर येथे आमच्या कोरडवाहू उथ्थान फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून आठवडेबाजार भरविला जात होता. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला हुसकावून लावले. स्वत: आठवडेबाजार ताब्यात घेऊन बाजारात शेतकºयांऐवजी व्यापारी बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील नाते तुटले. त्यामुळे पालिका व पणन विभागाने यात लक्ष देऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- सागर उरमुडे, संचालक, कोरडवाहू उथ्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अहमदनगर

टॅग्स :Puneपुणे