शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:23 AM

पिंपळवंडी येथील काकाडपट्टा शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.

पिंपळवंडी : येथील काकाडपट्टा शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.येथील काकडपट्टा व बाभूळबन शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, अनेक शेतकºयांची जनावरे फस्त केली आहेत. या ठिकाणी बिबट्याचा कायमच वावर असल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पिंपळवंडी परिसर हा बागायती क्षेत्र असलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे.बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसाही शेतात काम करणे अवघड झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी शेतमजूरसुद्धा मिळत नाहीत. एकीकडे शेतमालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी ऊस लावत आहेत, तर दुसरीकडे ऊस लावल्यामुळे बिबट्यांची दहशत वाढली आहे.काकडपट्टा शिवारात कायमच अगदी दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. जर बिबट्याला खाद्य मिळाले नाही तर तो माणसांवरही हल्ला करु शकतो. या शक्यतेने येथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.काकडपट्टा शिवारात वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरी प्रकाश काकडे, विकास काकडे, बाळशिराम काकडे, भाऊसाहेब काकडे, राजेंद्र काकडे, अविनाश वाघ, दत्ता काकडे, रामचंद्र वाघ आदी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे