शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune News: पोटच्या लेकराला दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडले, त्यांच्यासारखाच वागायचा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:55 IST

सोसायटीतील त्याच्या मित्रांनी तो अनेकदा अंगावर यायचा. चावा घ्यायचा, असे सांगितले. हल्ली हा मुलगा कुत्र्यासारखा वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोटच्या ११ वर्षांच्या मुलाला तब्बल दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार कोंढवा येथे उघडकीस आला असून, पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्यांसोबतच राहत असल्याने या मुलाचे वागणे त्यांच्यासारखेच झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर त्याच्या पालकांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सोसायटीतील जागरुक रहिवाशांनी या मुलाच्या दुर्दशेबद्दल ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना कल्पना दिली. त्यानुसार त्यांच्या पथकाने या घराला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलाच्या पालकांची कानउघाडणी केली; मात्र दुसऱ्या दिवशी हे पथक पुन्हा आले असता घराला कुलूप लावलेले होते. खिडकीतून डोकावून पाहिले असता हा मुलगा या कुत्र्यांमध्ये बसलेला होता. तसेच प्रचंड अस्वच्छता होती.

याबाबत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘या मुलाची सुटका केल्यानंतर तो कुत्र्यांसारखाच वागत असल्याचे निदर्शनास आले. तो काहीसा अशक्त दिसत होता. त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे. त्याचे पालक त्याचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला बालकल्याण समितीकडे देण्यात आले आहे.’

कुुटुंबच कुत्र्यांसोबत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, हे कुटुंबच सुमारे २२ कुत्र्यांसोबत राहत होते; मात्र बाहेर जाताना त्या मुलाला घरातच कोंडून बाहेरून कुलूप लावून जात होते. मुलाला सोडविले. त्यावेळी पालकांनी कोणताही विरोध केला नाही. कुत्र्यांच्या प्रेमापोटी आमचे लग्न झाले, त्यामुळे आम्ही कुत्री पाळली. त्यांच्यासोबतच आम्ही राहतो. बाहेर कोरोना असल्याने मुलाला घरातच ठेवत होतो, असेही त्यांनी सांगितले. सोसायटीतील त्याच्या मित्रांनी तो अनेकदा अंगावर यायचा. चावा घ्यायचा, असे सांगितले. हल्ली हा मुलगा कुत्र्यासारखा वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील म्हणाले, ‘प्राण्यांना व मुलांना एकत्र ठेवणे हा गुन्हा असून, या मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. समितीच्या निर्णयानंतर त्याच्या पालकांना अटक करण्यात येईल.’

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिस