शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नद्यांना फास जलपर्णींचा

By admin | Updated: February 5, 2017 03:21 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने

शेलपिंपळगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने अतिक्रमण केल्यामुळे हिवाळा संपता संपता नद्यांचा ताबा घेत असून पावसाळ्यापर्यंत त्यांचे साम्राज्य नद्यांवर राहते. परिणामी जीवनवाहिन्यांचा श्वास कोंडला जाऊन जलप्रदूषण फोफावत चालले आहे.जलपर्णींमुळे पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा निर्माण होत असल्याने पाण्यातील इतर जीवांसाठी धोकादायक ठरत आहे. कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी, गटारांमधील अस्वच्छ पाणी तसेच दररोजच्या वापरातील पाणी अवैधरित्या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने नद्यांमधील पाण्याचे अगोदरच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्रशासनाने नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याचा वर्षभर शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी उपयोग केला जातो.कारखान्यांमधील रसायनमिश्रीत, मलमूत्र अशुद्ध पाणी बेकायदेशीररित्या नद्यांच्या प्रवाहात सोडले जात असल्याने पाण्याच्या पृष्ठभागावर जलपर्णींचा विळखा पसरण्यास सुरुवात होते. दुर्गंधीमुळे त्रस्तनदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे केवळ डासांचीच निर्मिती होत नसून, एकाच जागी साठलेले दूषित पाणी व त्यातील जलपर्णींमुळे दुर्गंधी पसरली जात आहे. उग्र अशा दुर्गंधीमुळे नदीशेजारील रहिवाशांना घरात बसणेही मुश्कील होत आहे. डास आणि दुर्गंधी अशा दुहेरी त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येकडे आरोग्य विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होते.