शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

फेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 23:14 IST

फेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट 

पुणे : पुढील तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन राहणार, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार अशी माहिती देणारा व्हिडिओ सोमवारी दुपारी व्हायरल झाला. या व्हिडिओची सत्यता न पडताळता व वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नसताना एका पोलीस कर्मचार्‍यांनी विमानतळ परिसरात दुचाकीवरील माईकवरुन सर्वत्र चुकीची माहिती प्रसारीत केली. त्यामुळे विमानतळ परिसरात एकच घबराट पसरली. याबाबत आम्ही चौकशी करणार असून या कर्मचार्‍याने फेक व्हिडिओ पाहून चुकीची माहिती प्रसारित केली असल्याचे दिसून येते. त्याबाबतचा खुलासा आम्ही ट्विटरवर केला असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी, पुढील तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन राहणार असून त्यात सकाळच्या वेळी केवळ दुध विक्री दुकाने उघडी राहतील. मेडिकल वगळता सर्व दुकाने १०० टक्के बंद राहणार असल्याची सुचना पोलीस व्हॅन देत असल्याचा व्हिडिओ सोमवारी दुपारपासून शहरात व्हायरल झाला. त्यात पुण्यात आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने तो आणखीच व्हायरल होऊन लोकांमध्ये घबराट पसरली.

हा व्हिडिओ पाहून विमानतळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सपकाळ यांनी हा व्हिडिओ खरा मानून त्याची सत्यता न पडताळणी करता त्यांच्या दुचाकीला असलेल्या माईक वरुन पुढील तीन दिवस सर्व बंद राहणार असल्याची अनाऊन्समेंट करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊ लागला. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सपकाळ यांनी फेक व्हिडिओ पाहून त्यात सांगितल्याप्रमाणे चुकीची माहिती आपल्याकडील माईक वरुन प्रसारित केली आहे.

सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, संबंधित कर्मचार्‍यांची चौकशी केली जाईल. त्यांनी फेक व्हिडिओ पाहून ही अनाऊन्समेट केली असावी. मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी त्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. पुण्यात नेहमी प्रमाणेच लॉक डाऊन राहणार असून अत्यावश्यक सेवा किराणा दुकाने, मेडिकल व दुध विक्री सुरु राहणार आहे.तीन दिवस सर्व बंदचा व्हायरल होणारा व्हिडिओ आणि चौका चौकात तशीच माहिती देणारा पोलीस कर्मचारी यामुळे शहरात तसेच विमानतळ परिसरात मोठ्या घबराट निर्माण झाली होती.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या