पुणे : भरतीप्रक्रियेत तोतया उमेदवार उभा करून फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. लेखी परीक्षेसाठीच्या अर्जातील फोटो आणि शारीरिक चाचणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असलेली व्यक्ती वेगळी असल्याचे आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाबू पवार ( वय २७, रा. ओतूर, ता.जुन्नर) आणि दीपक पानसरे (वय २५, ता.जुन्नर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)
तोतया उमेदवाराकडून फसवणूक
By admin | Updated: April 29, 2017 04:06 IST