शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बोलून पोटगी; पत्नीला न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:48 IST

उपजीविकेसाठी नोकरीला असतानाही पोटगी मंजूर करून घेणाऱ्या विवाहितेला न्यायालयाने दणका दिला आहे.

पुणे : उपजीविकेसाठी नोकरीला असतानाही पोटगी मंजूर करून घेणाऱ्या विवाहितेला न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने संबंधित महिलेची पोटगी रद्द केली असून आजपर्यंत स्वीकारलेली पोटगी दोन महिन्याच्या आत परत करण्याचे आदेश दिले आहेत. बारामती येथील न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. लंकेशवर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.महिलेला दरमहा ४ हजार रुपये अशी अंतरिम पोटगी मंजूर झाली होती. मात्र नोकरी असूनही पोटगी घेणे महाग पडल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते. अनघा आणि अमोघ (नाव बदललेले) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिने त्याचा संसार आनंदात सुरू होता. मात्र काही दिवसांनंतर वाद होऊ लागला. कौटुंबिक हिंसाचार होत असल्याने अनघाने पती अमोघ, सासू, सासरे आणि दीर यांच्यावर बारामती येथील न्यायालयात दावा दाखल केला. ११ मार्च २०१६ रोजी अनघा यांनी अंतरिम पोटगीसाठी अर्ज दाखल केला. डिसेंबर २०१६ मध्ये अनघाला न्यायालयाने प्रतिमहिना ४ हजार रुपये अशी अंतरिम पोटगी मंजूर केली होती. मात्र पती अमोघला दरमहा चार हजार रुपये पोटगी देणे शक्य नव्हते. काही महिने पोटगी न दिल्याने अनघाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे अमोघविरोधात अटक वॉरंट निघाले. परंतु, अमोघ यांना अनघा ही नोकरी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अ‍ॅड. भूषण कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली.दरम्यान, त्यांनी अनघा नोकरी करीत असलेल्या कंपनीतून सर्व कागदपत्रे मागविली. अनघा न्यायालयात हजर झाल्यानंतर तिने साक्षीदरम्यान पोटगीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी नोकरी असल्याचे मान्य करून त्या नोकरीमधून उत्पन्न मिळत असल्याचे मान्य केले होते. या सर्व बाबी न्यायालयासमोर सिद्ध झाल्यानंतर अमोघने पोटगीचा हुकूम रद्द करण्यासाठी, आजपर्यंत भरलेली पोटगी परत मिळण्यासाठी, अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला. याप्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले दिल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लंकेश्वर यांनी अमोघच्या बाजूने निकाल दिला. तसेच आजपर्यंत स्वीकारलेली पोटगी दोन महिन्यांत परत करण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्ताने निघालेले अटक वॉरंटही रद्द केले.खोटे बोलणे पडेल महागातघटस्फोट झाल्यानंतर पत्नीला घरभाडे आणि उपजीविकेसाठी पतीकडून पोटगी दिली जाते. पतीच्या उत्पन्नावर पोटगीची रक्कम ठरते, असे असताना पत्नी कमावती असेल तर शक्यतो तिला पोटगी नाकारली जाते. मात्र न्यायालयासमोर नोकरीबाबत खोटे सांगून पोटगी मिळविणाºया महिलांना बारामती न्यायालयाने दिलेला हा आदेश म्हणजे एक चपराक आहे. त्यामुळे खोटे बोलून पोटगी मिळविणे महागात पडणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय