शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

बनावट नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:09 AM

दोन महिलांसह पाच अटकेत; सव्वाचार लाखांच्या बनावट नोटा जप्त

पुणे : तमिळनाडूमधे बनावट नोटा छापून त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये चलनात आणणाºया एका बड्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात दोन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वाचार लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत.

राजेश चंद्रभान ढिलोड (वय ४५, रा. रामवाडी पोलीस चौकीसमोर, नगर रोड), अलका रोहिदास क्षीरसागर (वय ४४, रा. ताडीवाला रोड), आनंद यशवंत जाधव (वय ३६, रा. मंचर), त्याची पत्नी सुनीता आनंद जाधव (वय ३०) व व्यंकटेश सुब्रमण्यम मुदलीयार (वय ४४, रा. तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, श्रीहरी नायर हा पसार झाला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील सहायक फौजदार अनिल ऊसुलकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ढोले पाटील रस्त्यावर एक महिलेसह दोघे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार, पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, अतुल गायकवाड व त्यांचे पथकाने याठिकाणी सापळा रचून राजेश ढिलोड व अलका क्षीरसागर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील २ हजारांच्या ५५ व ५०० रुपयांच्या १०४ अशा एकून १ लाख ६२ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

तपासादरम्यान आनंद व त्याची पत्नी सुनीता यांची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली असता २४ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. चौघांकडील चौकशीत व्यंकटेश मुदलीयार व श्रीहरी नायर हे दोघे तमिळनाडूत बनावट नोटा छापून येथे चालविण्यासाठी पाठवित असल्याचे निष्पन्न झाले. एक पथकाने आंध्र प्रदेशातील चेन्नै गावात जाऊन व्यंकटेश याच्या घरावर मध्यरात्री छापा टाकला. त्यावेळी आरोपी बनावट नोटा छापत असल्याचे स्पष्ट झाले. नोटा छापण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि छापलेल्या २ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

मुदलीयार हा श्रीहरी शिवाय इतर कोणाच्या संपर्कात नव्हता. श्रीहरी पुण्यातील अटक आरोपींना बनावट नोटा देत. ताडीवाला परिसरात आरोपी किरकोळ वस्तू खरेदी करून या नोटा चलनात आणत होते. तर, मंचर परिसरातही पती-पत्नी आठवडी बाजारात बनावट नोटा चलनात आणत. नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार होता. त्याने आतापर्यंत साधारण दहा लाख बनावट नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.यूट्युबवर पाहून तयार केल्या नोटाव्यंकटेश हा मुळचा पुण्यातील असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, मारामारी, पेट्रोल भेसळ यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर आल्यापासून तो फरार आहे. ट्रकच्या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने बनावट नोटा छापण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार तो यूट्युुबवर पाहून नोटा तयार करू लागला. त्यावेळी तो श्रीहरीच्या संपर्कात होता. तो श्रीहरीकडे बनावट नोटा आणून देत. एक लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात तो खरे ४० हजार रुपये घेत. दर पंधरा दिवसांनी तो पैसे येऊन पुण्यात देत असल्याचे समोर आले आहे.