शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेचा केवळ बुरखा पांघरलाय - वैभव मांगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:36 IST

‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात.

पुणे : ‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. आज कुठल्याही मोठ्या देवस्थानचे ट्रस्टी हे सर्व नास्तिक लोक आहेत. अशा लोकांनी फक्त श्रद्धेचा बुरखा पांघरलेला आहे,’ असे परखड मत अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केले. शहीद भगतसिंग विचार मंचातर्फे आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते.‘अज्ञान मान्य करणे हा विज्ञानाचा आधार आहे. धर्म मात्र अज्ञानच मान्य करायला तयार नाही. ज्या देवस्थानाला मोठमोठे व्यापारी लोक जातात आणि पार्टनरशिपमध्ये बोली लावतात, ते देवाला चालतं का? जीवनातील प्रत्येक गोष्टीत तर्क असतो. तो शोधायला आपण लोकांना प्रवृत्त केले पाहिजे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर, इतिहास अभ्यासक डॉ. टी. एस. पाटील, अभ्यासक य. ना. वालवनकर या वेळी उपस्थित होते.गाय मारली म्हणून माणसाची हत्या...मांगले म्हणाले, ‘आज आपण खूप असहिष्णू होत चाललो आहोत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दाभोलकरांची हत्या होते. तिथे आपण काहीच करू शकलो नाही आहोत. एक गाय कोणीतरी मारली, असा संशय घेऊन एका माणसाची हत्या केली जाते. ज्या गाई रस्त्यावर फिरून मिळेल ते खातात, पोटात प्लॅस्टिक अडकून त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्याविषयी यांना काहीच वाटत नाही. पण कुठल्यातरी धर्मातल्या माणसाने गाय मारली, म्हणून त्यांची हत्या केली जाते, हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे.’

टॅग्स :vaibhav mangleवैभव मांगलेPuneपुणे