शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 15:23 IST

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत राज्यातील विविध डाॅक्टरांचा समावेश आहे.

पुणे :  मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयातील तरुण निवासी डॉक्टरीपायल तडवी यांच्या दुर्देवी आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायामध्ये सामाजिक व श्रेणीय पैलू निर्माण करण्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना करण्यत आली आहे.

निवासी डॉक्टरांवर व प्रामुख्याने सरकारी रुग्णायांतील निवासी डॉक्टरांवर कामाचा कमालीचा ताण असतो आणि त्यामुळे त्यांना नैराश्य येते, ही बाबसर्वांना माहीत आहे. संबंधित प्रकरणात, जातीय भेदभाव व कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. जर हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे व त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायाने जात, धर्म व राजकारण या अडळ्यांवर केव्हाच मात केली आहे. वैद्यकीय समुदायात किंवा रुग्णांमध्येकोणत्याही बाबतीत भेदभाव केला जात नाही. परंतु, या अलिखित नियमामध्ये, वैयक्तिक हेवेदावे व वर्तन निर्माण होऊ शकते. आयएमए भेदभाव करणा-या कोणत्याही वर्तनाकडे कानाडोळा करत नाही.

डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थिती काम करावे लागते ती स्थिती व विशेषत: सरकारी रुग्णालयांतील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार आहे आणि एका आठवड्यामध्ये समितीने आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. अभ्यासाच्या अहवालाच्या अनुषंगाने, सद्यस्थितीच्या संदर्भात योग्य उपाय राबवले जातील असे आयएमए तर्फे सांगण्यात आले आहे.

आयएमए सत्यशोधक समितीमधील सदस्य कोण?डॉ. अशोक आढाव (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर), डॉ. रवी वानखेडेकर (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, धुळे), डॉ. चंद्रकांत म्हस्के, (डीन जीएमसी नांदेड),  डॉ. होझी कपाडिया, (आयएमए  प्रदेशाध्यक्ष, मुंबई) डॉ. सुहास पिंगळे, (आयएमए  राज्य सचिव) या सदस्यांचा समावेश आहे.

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीPuneपुणेdoctorडॉक्टर