शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिनची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:40 IST

खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन सुविधेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली.

चाकण : खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन सुविधेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली. खराबवाडी येथील माहिला बचत गटाच्या वतीने व निगडी येथील कार्बियॉन मल्टिसर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या विशेष सहकार्याने या मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माशिनद्वारे माफक दरामध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशालेत एक अभिनव व स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने महिलांचे कौतुक करून आभार मानले. या मशिनच्या खरेदीसाठी खराबवाडीतील बचत गटाच्या महिला रेवती कड, अनिता कड, नंदा कड, मंगल देवकर, चारुशीला माने, योजना सोमवंशी व संगीता केसवड यांनी विशेष सहकार्य केले. मशिनच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. एल. भोसले, डॉ. इंगवले, प्रशांत अष्टेकर, सहशिक्षक राजेश बोराटे, अशोक ठाणगे, सहशिक्षिका अश्विनी मेदनकर, मैथिली जाधव, चेतना कड, तनुजा खराबी उपस्थित होत्या.प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या कालावधीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समाजात मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज, योग्य शास्त्रीय माहितीचा अभाव व आरोग्य हितकारक साधनांची कमतरता इत्यादी कारणांनी मासिक पाळीमुळे मुलीच्या शिक्षणात व्यत्ययदेखील येतो. या सर्व बाबींचा विचार करून मासिक पाळीबाबतची शास्त्रीय माहिती देणे व या संदर्भातील आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशालेत हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे