शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:30 IST

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर दोघे फरार झाले, अशी साक्ष या साक्षीदाराने नोंदविली.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शनिवारी  प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर दोघे फरार झाले, अशी साक्ष या साक्षीदाराने नोंदविली.विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोपनिश्चिती करण्यात आली. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या साफसफाई विभागातील कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष झाली. त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती.घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफसफाई करीत होते. त्यांची महिला सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हायडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एकाला गोळ्या झाडताना व ती व्यक्ती खाली पडल्याचे पाहिले. गोळ्या झाडल्यानंतर दोघे तरुण पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. साक्षीदार डॉ. दाभोलकरांच्या जवळ गेले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार हे चित्तरंजन वाटिकेत साफसफाईसाठी निघून गेले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने ॲड. ओंकार नेवगी या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. पुढील सुनावणी २३ मार्चला आहे.साक्षीदारांनी सांगितला घटनाक्रमहा सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर