शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सतरा विश्वस्तांची हकालपट्टी, सहधर्मादाय आयुक्तांचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 23:15 IST

ढाकाळे येथील जोगेश्वरी मंदिर, मारुती मंदिर देवस्थान गैरकारभार प्रकरण

बारामती : तालुक्यातील ढाकाळे येथील जोगेश्वरी मंदिर व मारुती मंदिर देवस्थान गैरकारभार प्रकरणी सतरा विश्वस्तांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहधर्मादाय आयुक्तांनी याबाबत आदेश दिले आहेत. राज्यात प्रथमच देवस्थानच्या विश्वस्तांवर कारवाई झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या कारवाईला महत्व आले आहे.

ढाकाळे येथील सूर्यकांत नीलकंठराव जगताप यांच्यासह अन्य काहीजणांनी २००१ मध्ये श्री जोगेश्वरी व मारुती मंदिर देवस्थान या नावाने न्यास अस्तित्वात आणले. त्यानुसार न्यास अस्तित्वात आणण्याचा उद्देश बाजूला राहिला. त्याऐवजी देवस्थानच्या आड कटकारस्थाने शिजू लागली. विश्वस्तांचा मनमानीपणा वाढतच गेला. त्यामुळे गावात नेहमीच तणावाची परिस्थिती राहिली. लाखो रुपयांची देणगी तसेच शासकीय मदत मिळून देखील देवस्थान च्या सोयीसुविधांपासून भक्त वंचित राहिले. मंदिराची निगा राखली गेली नाही. न्यासाच्या घटनेप्रमाणे वार्षिक बैठक झाल्या नाहीत. मंदिरासाठी गावकरी तसेच देणगीदारांनी जमा केलेल्या रकमेच्या पावत्या त्यांना देण्यात आल्या नाहीत. कोणताही व्यवहार धनादेशाद्वारे झाला नाही. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे कोणतेही ‘आॅडिट रिपोर्ट’ दाखल केले नाहीत. देवस्थानच्या वतीने राबवण्यात येणारे पारंपरिक उत्सव समारंभामध्ये गावकऱ्यांना सहभागी करून घेतले नाही. सरपंच, उपसरपंच यांना देखील विश्वासात घेतले गेले नाही. रोख स्वरूपात रकमा देऊन तसेच घेऊन अफरातफर करण्यात आली, असे आरोप करीत देवीचे भक्त शिवाजीराव सुभेदार जगताप व त्यांचे सहकारी यांनी यांनी थेट सह धमार्दाय आयुक्त यांच्याकडे दिनांक २४ मार्च २०११ रोजी लेखी तक्रार दाखल केली. सह धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर हे प्रकरणाची सात वर्ष सुनावणी सुरु होती. अखेर १७ सप्टेंबर २०१८ रोजी सह धर्मदाय आयुक्त यांनी अंतिम निर्णय दिला.

या निर्णयांमध्ये सह धर्मादाय आयुक्त यांनी ट्रस्टचे विश्वस्तांनी २००४ ते २००६ या कालावधीत कोणत्याही प्रकारचे आॅडिट रिपोर्ट दाखल केले नाहीत. देणगीद्वारे आलेल्या रकमा बँक खात्यामध्ये जमा नाही. दरमहा तसेच वार्षिक मीटिंग वेळोवेळी घेतल्या नाहीत, असे निष्कर्ष नोंदविले. विश्वस्तांनी देणगी स्वरूपात मिळणारी रक्कम बँक खात्यावर जमा केले नाही. त्याचा योग्य विनियोग केला नाही. मनमानी कारभार करून न्यासाच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला असल्याचेही निष्कर्ष नोंदविले आहेत. देवस्थानच्या विश्वस्थांनी कायद्याच्या कलम ४१ डी अन्वय तरतुदींचा अभंग केला आहे, अशा प्रकारचे निष्कर्ष नोंदवत गैरकारभार करणाºया सतरा विश्वस्तांना बरखास्त करण्याचे आदेश सह धमार्दाय आयुक्त यांनी दिले. २१ विश्वस्त असणाºया देवस्थान न्यासाच्या सतरा विश्वस्तांवर कारवाई झाल्यानंतर उर्वरित ४ विश्वस्तांनी सहा महिन्यांच्या कालावधीकरता सह धमार्दाय आयुक्त यांच्या परवानगीने कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कामकाज पाहणाºया चार विश्वस्तांना सह धमार्दाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही. याप्रकरणी अर्जदार यांच्यावतीने सह धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात अ‍ॅड रमेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड अनिल होळकर यांनी बाजू मांडली. अर्जदार यांच्यावतीने कागदपत्रे तसेच साक्षी पुरावे सादर केले. अ‍ॅड होळकर यांनी केलेला युक्तिवाद, साक्षी पुरावे ग्राह्ण धरत सह धर्मादाय आयुक्त यांनी सतरा विश्वस्तांना अपात्र ठरविले.

दरम्यान, सहधर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार सतीश भालचंद्र जगताप, मिलिंद मुरलीधर जगताप, पुष्पराज विश्वासराव जगताप आणि धनराज शिवाजी जगताप यांना सहा महिन्यांच्या आत इतर विश्वस्तांची नेमणूक करण्याचे आदेश केले आहेत. सहा महिन्याच्या कालावधीमध्ये विश्वस्तांनी ट्रस्ट च्या बाबतीत कुठलेही निर्णय सह धमार्दाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय घेऊ नयेत असा हुकूम करण्यात आला आहे ....यांना ठरविले अपात्रसहधर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार सूर्यकांत निळकंठराव जगताप, पोपट तुकाराम जगताप, विश्वास गणपतराव जगताप, फत्तेसिंह गणपतराव जगताप, शिवाजी गणपतराव जगताप, हनुमंतराव बलवंतराव जगताप, मुरलीधर गेनबा जाधव, निर्मला कांतीलाल जगताप, शिवाजी गणपतराव शेळके ,काळू यशवंत गायकवाड, संपत आण्णा कोकरे, दत्तात्रय यादवराव वाघमारे, हनुमंत धोंडीबा शेळके, बाळासाहेब लालासाहेब जगताप, वसंत निवृत्ती कुंभार, शंकर तात्याबा रासकर, प्रभाकर महादेव कांबळे यांना सन २०१५ ते २०२० या कालावधीकरता विश्वस्त म्हणून अपात्र केले आहे ....अखेर न्याय मिळालादेवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विश्वस्तांनी जोगेश्वरी व मारुती चे मंदिर राजकीय अड्डाच बनवला होता. गावातील सत्ताकेंद्रे काबीज करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता . ट्रस्टची निर्मितीचा उद्देश कुठेही सफल होताना दिसला नाही. गैरकारभार तसेच राजकारण वाढतच गेले. त्याचबरोबर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्याविरोधात गावकºयांच्या मदतीने लढा उभारला ७ वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर न्याय मिळाला. याकामी वकील अनिल होळकर यांची मोलाची साथ मिळाली, असे तक्रारदार शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे