शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रस्त्यावरच्या हातगाडी परवाना हस्तांतरणासाठी जादा शुल्क आकारणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:44 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परवाना हस्तांतरणासाठी २५ हजार रुपये शुल्क ठराव करून निश्चित केले आहे.

ठळक मुद्देनव्या श्रेणीचा विषय गेले दोन वर्षे पदाधिकारी स्तरावर प्रलंबितसंबधित परवाना विकत घेणाऱ्याने याबाबत जाणीव या संघटनेकडे तक्रार सर्वसाधारण सभने अद्याप रस्त्यांची श्रेणी व त्यानुसार दर आकारणीला दिलेली नाही मान्यता प्रत्येक परवाना हस्तांतरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजूरी आवश्यक

पुणे: रस्त्यावरच्या हातगाडी विक्रेत्यांच्या परवाना हस्तांतर प्रकरणात महापालिका नियमापेक्षा जास्त पैसे घेत आहे. गेल्या काही महिन्यात असे प्रकार वाढले असून जाणीव या विक्रेत्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेने या जादा पैशांच्या परताव्याची लेखी मागणी प्रशासनाकडे केली आहे.कौटुंबिक अडचणी, कर्जबाजारीपणा किंवा अन्य काही कारणाने विक्रेते त्यांच्याकडील महापालिकेचा अधिकृत विक्रेते असल्याचा परवाना दुसऱ्या व्यक्तीला विकतात. यासाठी त्यांच्यात स्वतंत्रपणे पैसे घेतले जातात. हा परवाना दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी महापालिकेचे काही नियम आहेत. किती पैसे आकारावेत ते निश्चित करण्यात आलेले आहे. बाजारपेठेनुसार त्याचे दर वेगवेगळे आहेत. अशा प्रत्येक परवाना हस्तांतरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजूरी आवश्यक आहे. यातील कोणत्याही नियमाचे पालन न करता प्रशासन जादा पैसे आकारत आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परवाना हस्तांतरणासाठी २५ हजार रुपये शुल्क ठराव करून निश्चित केले आहे. त्यानुसार शुल्क आकारणे बंधनकारक असताना प्रशासनाने एका प्रकरणात २५ हजार रूपयांऐवजी २ लाख ५०० रुपये शुल्क घेतले आहे. ते अधिकृतपणे घेतले आहे. ते बाजारपेठेच्या नव्या श्रेणीनुसार आकारत असल्याचे तोंडी खुलासा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात नव्या श्रेणीचा विषय गेले दोन वर्षे पदाधिकारी स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आला आहे. त्याचेही कारण प्रशासनाने एकदम शुल्क वाढ केली आहे हेच आहे. रोजच्या १०० रूपयांऐवजी थेट ५०० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. त्यातही रस्त्यांची श्रेणी ठरवण्यात आली आहे. दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच पदाधिकारी यावर काहीही निर्णय घेणे टाळत आहे. त्यांचा याबाबत काहीच निर्णय होत नसताना प्रशासनाने परस्पर अशी जादा शुल्क आकारणी सुरू केली आहे. संबधित परवाना विकत घेणाऱ्याने याबाबत जाणीव या संघटनेकडे तक्रार केली. संघटनेने त्यानुसार आता महापालिका आयुक्त तथा शहर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सौरव राव यांना याबाबत पत्र दिले आहे. त्यात प्रशासनाच्या या चुकीबाबत लिहिले असून संबधितांना त्यांचे घेतलेले जादा पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. -----------------शहर फेरीवाला समितीमध्ये रस्त्यांच्या श्रेणीबाबतचा ठराव सदस्यांच्या उपस्थितीत चर्चा करून मंजूर करण्यात आला आहे. बाजारपेठेच्या उलाढालीवर दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसारच शुल्क आकारणी केली जात आहे. तरीही यात काही अडचणी किंवा शंका असतील तर त्या दूर केल्या जातील. माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण निर्मुलन विभाग............संघटनेने केली परताव्याची मागणीसर्वसाधारण सभने अद्याप रस्त्यांची श्रेणी व त्यानुसार दर आकारणी याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे प्रशासन घेत असलेले जादा शुल्क बेकायदा आहे. ते परत करावे.संजय शंके, सरचिटणीस जाणीव 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका