शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

बाह्यवळणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:38 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई

राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई देण्यात वेळ जात आहे. रस्त्याच्या कामात अडथळा नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १३ धनाजी पाटील यांनी दिली.बाह्यवळणबाधित शेतकºयांची बैठक शनिवारी खेड पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक कदम, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सागर पाटोळे, लक्ष्मण कोकणे, मच्छिंद्र राक्षे, भास्कर जगदाळे, निवृत्ती होले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे. चांडोली येथे संभाव्य बिनशेती क्षेत्राच्या गुंठ्याला ७ लाख ४७ हजार रुपये व खरेदी-विक्री व्यवहारानुसार ठरलेल्या क्षेत्रातील गुंठ्याला ५ लाख ४६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. राजगुरुनगरला प्रतिगुंठा ४ लाख ५८ हजार रुपये, तर ढोरेभांबुरवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी या गावांमध्ये प्रतिगुंठा ४ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणारआहे. संपादनाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत १२ टक्के व्याजाने ही रककम शेतकºयांना दिली जाणार आहे.७/१२ तील गुंतागुंती : भरपाई मिळण्यास अडचणी७/१२ तील गुंतागुंत आणि प्रलंबित नोंदी यामुळे नुकसानभरपाई घेण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. काही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकºयांनी सात-बारा उतारे व त्यामध्ये असणाºया त्रुटींमुळे शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने भूसंपादन विभागाने ही बैठक बोलावली होती. फाळणी बारा न झाल्याने ७/१२ वर पूर्वीचे खातेदार आहेत. वहिवाट अनेक वर्षांची असली तरी नुकसानभरपाईला त्यामुळे अडचणी येत आहेत. सामाईक क्षेत्राबाबतही शेतकºयांमध्ये वादविवाद होत आहेत.पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणाºया जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. या वेळी अडचण असलेल्या शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून करण्यात आला.तडजोड होऊ न शकणाºया, तसेच वादविवाद असलेल्या अनेक शेतकºयांना पुढील सुनावणीसाठी पुण्यातील कार्यालयात पुराव्यासहउपस्थित राहावे, असे अधिकाºयांनी बाधित शेतकºयांना सांगितले.