शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गरीबांपर्यंत पोहोचवा: रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:57 IST

केंद्राच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबांना योजनेचा लाभआयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार

पुणे: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.तसेच केंद्राच्या या योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या निवडक लाभार्थ्यांना आठवले आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ई-कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यावेळी आठवले बोलत होते. कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे,  निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे,आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, डॉ. अमोल म्हस्के आदी उपस्थित होते.आठवले म्हणाले, औषध आणि पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. गरीबांच्या भल्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. शासनातर्फे आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे.गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाने ही योजना सुरू केली असल्याचे नमूद केले.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे,असे समजून काम करावे,असे आवाहनही बापट यांनी केले. प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासनातर्फे २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार ८३ लाख ७२ हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेसाठी करण्यात आली आहे. त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यात शहरातील २ लाख ७७ हजार ६३३ तर ग्रामीण भागातील १ लाख ७९ हजार ३९५ कुटुंबांचा समावेश आहे. डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून ९७१ प्रकारचे उपचार, १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले.       -------------------------

टॅग्स :Puneपुणेprime ministerपंतप्रधानRamdas Athawaleरामदास आठवले