शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:45 IST

भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देउलगडवून दाखविण्यात आला राम गणेश गडकरी यांचा वाङ्मयीन प्रवास आणि जीवनपट रसिक प्रेक्षकांना आला गडकरींचा विनोद आजच्या समाजालाही लागू होत असल्याचा अनुभव

पुणे : ज्येष्ठ नाटककार, प्रतिभावंत कवी आणि हजरजबाबी विनोदी लेखक अशा राम गणेश गडकरींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध साहित्यछटा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली, ती ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाद्वारे. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या  कोथरुड शाखेद्वारे प्रस्तुत या कार्यक्रमाद्वारे कवी गोविंदाग्रज, विनोदी लेखक बाळकराम म्हणजेच नाटककार राम गणेश गडकरी यांचा वाङ्मयीन प्रवास आणि जीवनपट उलगडवून दाखविण्यात आला. श्रीराम रानडे यांचे संकलन आणि संपादन होते. विजय गोविंद यांनी व शब्दांकन आणि सादरीकरण केले. या वेळी भारतीय विद्याभवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे,  संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.अवघे ३४ वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या राम गणेश गडकरींच्या काळातील राजकीय-सामजिक वातावरण, त्यांच्या वाचनाचा  व्यासंग, त्यांचे आवडते लेखक, मराठीसह गुजराती आणि इंग्रजी भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्व अशा त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांची गुंफण करण्यात आली.  राम गणेश गडकरींनी विविध साहित्यप्रकार किती सहजपणे हाताळले आणि त्यात आपला प्रतिभासंपन्न ठसा कसा उमटवला, याचा प्रत्यय त्यांच्या नाटकातील निवडक संवाद, कविता आणि त्यांच्या साहित्यातील विनोदी किश्श्यांच्या अभिवाचनातून आला. ‘प्रेमसंन्यास,’ ‘पुण्यप्रभाव,’ ‘राजसंन्यास,’ ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’ या नाटकातून गडकरींनी ऐतिहासिक आणि सामाजिक विषय हाताळून मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. समाजातील विसंगतीचे बारकावे हेरून त्यावर मार्मिक भाष्य करणारा गडकरींचा विनोद आजच्या समाजालाही लागू होत असल्याचा अनुभव या वेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांना आला. 

टॅग्स :Puneपुणे