शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

रुपी बँकेच्या ‘ओटीएस’ला मुदतवाढ : सहकार विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:00 IST

राज्य सरकारने रुपी सहकारी बँकेच्या एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेस आर्थिक निर्बंध कायम असेपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे त्यामुळे थकीत कर्जाची वसुली करणे सुलभ होणार आहे.

ठळक मुद्देअर्थिक निर्बंध असेपर्यंत राहणार योजना सुरुआरबीआयने बँकेवरील आर्थिक निर्बंध येत्या ३१ आॅगस्टपर्यंत वाढसहकार विभागाने रुपी बँकेस महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१मधील नियम ४९ मधून सूट चालू आर्थिक वर्षांत किमान ५५ कोटी रुपयांचा नफा मिळविण्याचे उद्दिष्ट

पुणे : रुपी सहकारी बँकेच्या एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेस राज्य सरकारने आर्थिक निर्बंध कायम असेपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याकरीता बँकेच्या प्रशासनाला वारंवार नव्याने विनंती अर्ज करावा लागणार नाही. तसेच, त्यामुळे थकीत कर्जाची वसुली करणे सुलभ होणार आहे.  रुपी सहकारी बँकेने विशेष एकरकमी परतफेड योजनेसाठी १४ मार्च २०१७ रोजी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. या योजनेची मुदत ३१ मे २०१८ रोजी संपली. तसेच आरबीआयने बँकेवरील आर्थिक निर्बंध येत्या ३१ आॅगस्टपर्यंत वाढविले आहेत. ओटीएस परवानगी संपल्याने कर्ज वसुली करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ठेवीदारांंचे हित लक्षात घेऊन याला मुदतवाढ देण्याची मागणी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने सहकार आयुक्तांकडे ७ जून रोजी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने रुपी बँकेस महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१मधील नियम ४९ मधून सूट दिली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय) जो पर्यंत निर्बंधाचा कालावधी वाढवेल, तो पर्यंत ओटीएस योजना बँकेत चालू राहील. रुपी बँकेचे राज्यभरात ६ लाख २२ हजार ठेवीदार आहेत. त्यांची १ हजार ५१६ कोटी रुपयांची रक्कम त्यात अहे. बँकेच अन्य बँकेत विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. थकीत कर्जाची वसुली होऊन, बँकेचा संचित तोटा कमी झाल्यास विलिनीकरण प्रक्रिया वेगाने होईल. त्यामुळे ओटीएस योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. बँकेने २०१७-१८मधील आर्थिक वर्षांत ५ कोटी ४७ लाख रुपयांचा संचलनात्मक नफा मिळविला आहे. तसेच ४२ कोटी ८० लाख रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. तसेच जून २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेने ११ कोटी ६४ लाख रुपयांची वसुली केली असून, या तिमाहीत १ कोटी ७८ लाख रुपयांचा संचलन नफा मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांत किमान ५५ कोटी रुपयांचा नफा मिळविण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. -----------------ओटीएसची सध्याची स्थिती- एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत १३४ कोटी १२ लाखांचे प्रस्ताव मंजुर. त्या पैकी ९४ कोटी ६१ लाख रुपयांची वसुली- एकरकमी योजनेतील ३९ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुली प्रगतीपथावर- २०१७-१८मध्ये बँकेतील ठेवी, इतर देणी, बँकेची गुंतवणूक आणि मालमत्ता यातील तूट ४६० कोटी रुपयांवरुन ४४० कोटींवर आरबीआय व ठेवीदारांची अपेक्षामहाराष्ट्र सहकारी कायदा कलम ८८ नुसार अपिलांची तातडीने सुनावणी घ्यावी

टॅग्स :PuneपुणेbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक