शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेतून वेळेआधी परतलेल्या मान्सूनची देशभरातून एक्झीट; अहमदनगर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:12 IST

नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़. पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़ 

ठळक मुद्देसाधारणपणे १५ डिसेंबरला संपूर्ण भारत आणि द्वीपसमुहातून माघारी परततो़.मॉन्सूनने एक्झीट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वार्‍यांचा जोर वाढला आहे़.

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़ गोवा, महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले होते़ पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़ राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीला उशिरा सुरुवात झाली असली तरी तो वेगाने परतला आहे़ महाराष्ट्र, कर्नाटकातून तो १५ आॅक्टोबरपर्यंत माघारी जात असतो़ मात्र, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दक्षिणेतील राज्यांमध्ये तो सक्रीय असतो़ या तीन महिन्यात दक्षिणेतील राज्यांमध्ये एकूण पावसापैकी ३० टक्के पाऊस पडतो़ त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांसाठी या तीन महिन्यांतील पावसाचा स्वतंत्रपणे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे़ हवामान विभागाच्या आजवरच्या आकडेवारीनुसार साधारणपणे १५ डिसेंबरला संपूर्ण भारत आणि द्वीपसमुहातून माघारी परततो़ श्रीलंकेत तो १ जानेवारीपर्यंत सक्रीय असतो़ पण, यंदा त्याने दक्षिणेतून वेळेआधी एक्झीट घेतली आहे़ त्यामुळे आता उत्तर भारताप्रमाणे दक्षिणेतही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ मॉन्सूनने एक्झीट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वार्‍यांचा जोर वाढला असून त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे सर्वात कमी किमान तापमान १२़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी आहे़ अकोला १६़५, नाशिक १३़८, उस्मानाबाद १४़९, पुणे १५़१, महाबळेश्वर १६़२, वर्धा १५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तेथील तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र