शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

वेश्याव्यवसायातून परदेशी महिलेची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 2:54 AM

बाळू बाळासाहेब सातपुते (रा. जि. परभणी, सध्या विमाननगर) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी फिर्याद दिली.

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल लोटस येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उकबेकिस्तान या देशाच्या महिलेची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. याप्रकरणी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

बाळू बाळासाहेब सातपुते (रा. जि. परभणी, सध्या विमाननगर) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी फिर्याद दिली. सातपुते हा आपली व आपल्या साथीदारांच्या उपजीविकेसाठी वेश्यागमनातून पैसे मिळवत असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. याच माहितीनंतर त्यांनी लोट्स हॉटेलमधील रूम नंबर १०५ मध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये महिलेची सुटका केली.सातपुतेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामध्ये इतर एजंटांची माहिती मिळविणे, परदेशी महिला कोठे एकत्र ठेवल्यात का? मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे, अशा विविध बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.कोकेन बाळगल्याप्रकरणी एकाला अटकपुणे : विक्रीसाठी कोकेन बाळगणाऱ्या घाना देशातील एका नागरिकाला दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अ‍ॅन्ड्र्यू पॉलसन (वय ३०, रा.गोरेगाव ईस्ट, मूळ रा. जॉन स्ट्रीट, अ‍ॅक्रा, देश घाना) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. स्टेशन परिसरातील एम. एस. इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या समोरून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून ६ लाख ४० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४५ लाख रुपये आहे. कोकेन त्याने पुण्यात कोणाला विक्री करण्यासाठी आणले होेते, व्हीसा आणि पासपोर्टबाबत माहिती सांगण्यास आरोपी टाळाटाळ करत असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी