शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेतून सोयाबीनला वगळले; शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:31 IST

नाचणी पिकालाही मिळणार नाही नुकसानभरपाई

गहुंजे : पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम २०१८ साठी मावळ तालुक्यात या वर्षी फक्त भात व भुईमूग या दोनच पिकांचा समावेश करण्यात आल्याने या दोनच पिकांना विमा संरक्षण उपलब्ध होणार असून, संबंधित पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ देण्यात आली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील नाचणी व सोयाबीन या पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या योजनेंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी शेतकºयांनी दोन टक्के विमा हप्ता रक्कम भरल्यास उरलेली ९८ टक्के रक्कम शासन भरणार आहे. शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत नजीकच्या बँक शाखेत व आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्ता आॅनलाइन भरणा करता येणार आहे. विमा हप्ता भरताना अर्जासोबत शेतकºयांना सात-बारा (7/12), 8 अ, बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करावी लागणार आहे. जिल्हा सहकारी बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सोसायटी सचिव यांच्याशी पीक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.काळे कॉलनी येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत या विमा योजनेची शिवली, कोथुर्णे, मोरवे, शिलिंब, जवन, ठाकुरसाई, करुंज, कढधे, तुंग, महागाव, धनगव्हाण, काले आदी गावांमध्ये प्रचार-प्रसिद्धीचे काम सुरू असून, परिसरातील शेतकºयांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे यांनी केले आहे.भात व भुईमूग पिकांसाठी विमा हप्ता दोन टक्के दराने आकारण्यात येणार आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी 842 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून 42 हजार 100 रुपये संरक्षित रक्कम असणार आहे. भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून, 31500 प्रति हेक्टरी रुपये संरक्षित रक्कम राहणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार भात व भुईमुग पिकांचे नुकसान व स्थानिक नैसर्गिक नुकसानीच्या बाबी विमा संरक्षणात समाविष्ट असल्याचे कृषी सहायक अधिकारी विकास गोसावी,दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर बुचडे, शीतल गिरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीfarmer suicideशेतकरी आत्महत्या