शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उत्साह ग्रामीण भागात निरुत्साह; पुण्यात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान

By नितीन चौधरी | Updated: May 13, 2024 10:04 IST

पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे

पुणे : पुणे शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या काळात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ६.६१, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ५.३८ तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ४.९७ टक्के मतदान झाले आहे अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत असून मतदार यादीत नाव वगळल्याच्या तक्रारी ही मतदारांकडून येत आहेत पहिल्या दोन तासात मतदान शांततेत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

राज्यातील चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी आज पुणे शिरूर मावळ मतदार संघासाठी मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात शहरी भागात मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात फारसा उत्साह नसल्याचेही चित्र आहे. शहरी भागांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे सापडत नसल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत आहेत. सकाळच्या टप्प्यात अनेक नोकरदार मतदारांनी रांगा लावले असून ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. शहराच्या बहुतांश भागांमध्ये सकाळच्या या टप्प्यात गर्दी असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दोन तासात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. मात्र ग्रामीण भागात उत्साहन असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात ४.९७ टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतदानाला तुलनेने बरा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी ५.३८ टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी ३७ बॅलेट युनिट १३ कंट्रोल यूनिट आणि  १७ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. पुणे लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी २४ बॅलेट युनिट ८ कंट्रोल यूनिट आणि २४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरूर लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलवेळी २४ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे. 

टॅग्स :pune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४ElectionनिवडणूकVotingमतदान