शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पळवाट काढत कापडी मास्कची जादा दराने विक्री; नागरिकांची होतेय फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:48 IST

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात मास्क विक्रीचे दर निश्चित केले आहेत..

 तेजस टवलारकर -पिंपरी : राज्य सरकारने एन ९५ मास्क, दोन आणि तीन पदरी मास्कचे दर ठरवून दिले आहेत. त्यानुसारच मेडिकल दुकानदारांना विक्रीचे आदेश दिले आहेत. तरीही पिंपरी-चिंचवड शहरातील काही मेडिकल दुकानदारांनी सोयीस्कररित्या पळवाट काढली आहे. एन ९५ मास्कचा कृत्रिम तुटवडा दाखवून कापडी मास्क जादा दराने विकले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असून, प्रशासकीय यंत्रणेचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले.

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात मास्क विक्रीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत, दोन पदरी मास्क ३ रुपये, तीन पदरी ४ रुपयांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील मेडिकल दुकानांची पाहणी केली असता, बहुतांश मेडिकलमध्ये शासनाच्या दरानुसार मास्कची विक्री होत नसल्याचे ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीने मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

मेडिकल दुकानदाराला विचारले की, एन ९५ मास्क पाहिजे, तर त्यांनी सांगितले, एन ९५ मास्क उपलब्ध नाही. सध्या एन ९५ मास्कचा तुटवडा आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले की, नागरिक एन ९५ मास्कपेक्षा कापडी मास्क जास्त वापरत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त दुकानदार कापडी मास्क विकत आहेत. कापडी मास्क कितीला आहे, असे विचारले असता ३० रुपयांपासून तर १३० रुपयांपर्यंत कापडी मास्क असल्याचे त्यांनी सांगितले. एन ९५ मास्क शहरात कोणीच विकत नाही का? तर ते म्हणाले की, सरकार म्हणते की ९५ मास्कची विक्री १५ रुपयांना विका, आम्हालाच १५ रुपयांना मिळत नाही तर आम्ही कसे विकायचे. त्यामध्ये काहीही मार्जिन (कमिशन) सूटत नाही.शासनाने कापडी मास्कचे दर निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना कापडी मास्क जादा दराने विकले जात आहेत. कापडी मास्कचे विविध प्रकार दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. साधा कापडी मास्क ३० रुपयांपासून तर १३० रुपयांपर्यंत विकल्या जात आहे.

--दर फलकाचा विसरराज्य सरकारच्या नियमानुसार मास्कचे दरफलक लावणे आवश्यक आहे. शहरातील बहुतांश दुकानदारांनी दर फलक लावले नाहीत. राज्य सरकारच्या नियमांचा दुकानदारांना सोयीस्कररित्या विसर पडला असल्याचे दिसून आले.--शासनाने मास्कचे दर ठरवून दिले आहेत. एन ९५ मास्कच्या संदर्भात कारवाई करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला आहे. कापडी मास्क संदर्भात कारवाई करण्याचा अधिकार वजन मापे विभागाला आहे. त्यांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. दर फलकाविषयीसुद्धा ते कारवाई करू शकतात.एस. बी. पाटील, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याfraudधोकेबाजी