शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत मिळाला घटस्फोट : अपवादात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 17:14 IST

वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देआधीपासून वेगळेगळे रहात असल्याने सहा महिन्यांची अट शिथीलदोघांनाही पुण्यात राहणे शक्य नसल्याने, अपवादात्मक आदेश 

पुणे : वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून दोघे वेगळेगळे राहत होते. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. 

         कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा दावा निकाली काढला. तुषार आणि हेमा (नावे बदलली आहेत) या दोघांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचे आॅक्टोबर २०१४ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगाही आहे. तुषार हा सरकारी नोकर आहे. तर हेमा उच्चशिक्षित असून पुण्यातील एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करते. दोघांनाही चांगल्या पगाराच्या नोक-या आहेत. लग्नानंतर त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे एकमेकांशी सुर जुळत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतरही दोघांचे पटेनासे झाल्यावर घटस्फोट मिळावा म्हणून त्यांनी दावा दाखल केला. 

          हेमाला नोकरीसाठी  इंग्लडला जायचे होते. तेथील प्रकल्पात तिला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तर तुषारची देखील बदली होणार होती. त्यामुळे त्यांनी परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा तीन महिन्यात निकाली निघाला. न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात सहा महिन्याचा कालावधी वगळून त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला.अ‍ॅड. शशिकांत बागमार, अ‍ॅड. निनाद बागमार यांच्यामार्फ त दावा दाखल करण्यात आला होता.  

अशी आहे सहा महिन्यांची तरतुद :

हिंदु विवाह कायद्याप्रमाणे पती पत्नी सहसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी पती पत्नी एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील तर ते घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात. हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेश या दाव्यात न्यायालयाने दिला.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयDivorceघटस्फोट