शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामात मिळणाऱ्या खडकाची फरशी होणार, मेट्रोचे रिसायकलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:15 IST

मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न आहे.

पुणे : मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न आहे.मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारीमार्गाचे काम येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठीच्या प्राथमिक चाचण्या करण्यात येत आहेत. त्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सोमवारी मेट्रो कार्यालयात दिली. प्राथमिक चाचणीत अत्यंत टणक असा खडक लागला आहे. मेट्रोचा हा भुयारीमार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. तो जमिनीखाली तब्बल २५ ते ३० मीटर असणार आहे. त्यामुळे टणक खडक खोदूनच तो करावा लागणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे.या खडकाचा उपयोग काय करायचा? याचा विचार सुरू असतानाच तज्ज्ञांच्या समितीने खडक व्यवस्थित निघाला तर त्याची फरशी करून त्याचा वापर करता येणे शक्य आहे असे स्पष्ट केले. त्यामुळेच मेट्रो कंपनीने तसा विचार केला आहे. खडक भुगा होऊन निघाला तर हे करणे शक्य नाही, मात्र तज्ज्ञांच्या मते खडकाचे मोठे तुकडेच निघतील. तसे झाल्यास त्याचा फरशीसाठी वापर करता येणे सहज शक्य आहे, असे दीक्षित म्हणाले.- भुयारीकामात बराच राडारोडा निघणार आहे. मात्र महामेट्रो तो कुठेही टाकणार नाही, तर त्याचा योग्य तो विनियोग केला जाईल. आधुनिक तंत्रांचा वापर करून त्याचा विटा तसेच अन्य बांधकाम साहित्य तयार करण्यासाठीही वापर करण्यात येईल, असे दीक्षित यांनी सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रो