औद्योगिक वसाहतींच्या समस्यांबरोबरच तालुक्यातील विविध प्रश्नांकरिता मुळशीमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत भोर मुळशी वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
ते उरवडे येथे कार्यकर्त्यांशी संवाद करताना बोलत होते. याप्रसंगी कोरोनाकाळात रुग्णांना मोफत रिक्षासेवा उपलब्ध करून देणारे जांबे येथील रिक्षाचालक संतोष जैद यांना रोख अकरा हजार रुपये देऊन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कोरोनाकाळात रुग्णांकरिता हिंजवडी परिसरात मोफत रिक्षाची व्यवस्था करण्याचे काम जैन यांनी केले होते त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना रोख ११ हजार रुपयाचे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवकचे अध्यक्ष सुहास भोते, बाळासाहेब पवळे, भानुदास पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राम गायकवाड, पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, राहुल पवळे, महेश वाघ,नामदेव निकटे, आकाश जाधव, सागर मारणे, संतोष गुरव,रवी भंडलकर उपस्थित होते.