शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशहितासाठी सर्वांनी एकत्र यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 01:46 IST

सध्या देशभर फिरत असून, ब्राह्मण समाजाशी संवाद साधत आहे. समाजात अस्वस्थता असून, युवकवर्गासह सर्वांच्याच मनात अन्याय झाल्याची भावना आहे.

पुणे : सध्या देशभर फिरत असून, ब्राह्मण समाजाशी संवाद साधत आहे. समाजात अस्वस्थता असून, युवकवर्गासह सर्वांच्याच मनात अन्याय झाल्याची भावना आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तसेच हितासाठी देशभरातील ब्राह्मण संघटनांनी एकत्र येऊन ‘वन नेशन, वन आॅर्गनायझेशन’ या भावनेतून काम करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कलराज मिश्र यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात देशभरातील ब्राह्मण संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजिले होते. यामध्ये अनेक ठराव पारित करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे आदी उपस्थित होते. या महोत्सवात २९ आॅक्टोबरपर्यंत ब्राह्मण उद्योजकांचे प्रदर्शन आयोजिले आहे. या वेळी बंगळुरू येथील पंडित अरालुमल्लिगे पार्थसारथी, जम्मू येथील पंडित देवेंद्र शर्मा, हैदराबाद येथील वेणुगोपालाचार्य, बिहार येथील पंडित विनायक पांडे, बडोदा येथील शैलेशभाई मेहता यांना ‘समाजभूषण पुरस्कार’, तर सुप्रिया बडवे, नीलिमा तपस्वी व धनश्री जोग यांना ‘उद्योजिका पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. कलराज मिश्र म्हणाले, ‘‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राह्मण समाजातील युवक बेचैन आहेत. त्याबाबत आपण विचार केला पाहिजे. महिला संघटन, युवक संघटन केले पाहिजे. ब्राह्मण समाजाला त्यागाची परंपरा आहे. संस्कृति रक्षणासाठी ब्राह्मण समाजाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन देशाला दिशा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’।गोविंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘या राष्ट्रीय संमेलनात पाच प्रमुख ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये राममंदिराचा प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, काश्मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन त्यांच्या मूळ ठिकाणी केले जावे. ब्राह्मण समाजाला आरक्षणापेक्षाही संरक्षण प्राधान्याने द्यावे आणि आरक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुनर्मूल्यांकन होऊन त्यात कालानुरूप आवश्यक बदल करावेत.’’