मीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतले तरी बसत नाही कोणताही भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:08 AM2021-07-26T04:08:48+5:302021-07-26T04:08:48+5:30

(स्टार ९५३ डमी) पुणे : वीजमीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतले तरी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा भुर्दंड बसत नाही. त्यामुळे ...

Even if the meter reading is taken a day late, it does not fit | मीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतले तरी बसत नाही कोणताही भुर्दंड

मीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतले तरी बसत नाही कोणताही भुर्दंड

Next

(स्टार ९५३ डमी)

पुणे : वीजमीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतले तरी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा भुर्दंड बसत नाही. त्यामुळे मीटर रीडिंग एक दिवस उशिरा घेतल्यास साधारण हजार रुपयांचा फटका बसतो, असे बोलले जाते. पण ते खोटं आहे. उशिरा रीडिंग घेतल्याने विजेचा दर दुप्पट होतो आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो, यामध्येही काहीच तथ्य नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या घरगुती ग्राहकांना पहिल्या शंभर प्रतियुनिटपर्यंत ४.८२ रूपये तर औद्योगिक ७.५२ रूपये दर आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मुद्दाम उशिरा रीडिंग घेतले जाते, अशी चर्चा आहे. पण आपण मीटर रीडिंग शक्यतो त्याच दिवशी घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच एक-दोन दिवस जरी उशीर झाला तरी त्यामुळे राज्यातील ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा दंड अथवा नुकसान सहन करावे लागत नाही. आपल्या ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना टप्पे करून दिले आहेत. त्यामुळे दंड आकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

* महावितरणचे घरगुती दर - ४.८२ रूपये

* महावितरणचे औद्योगिक दर - ७.५२ रूपये

-----

चौकट

* १०० युनिटपर्यंत वीजदर

फिक्स दरासह घरगुती ग्राहकांना पहिल्या शंभर युनिटपर्यंत ४.८२ रूपये प्रतियुनिट दर आकारण्यात येत आहे.

* १०१ पासून १६० युनिट वीजदर

फिक्स दरासह घरगुती ग्राहकांना १०१ ते १६० युनिटपर्यंत ८.७२ रूपये प्रतियुनिट दर आकारण्यात येत असल्याचे महावितरणने सप्ष्ट केले आहे.

----

घरगुती ग्राहकांचे मीटर रीडिंग एक अथवा दोन दिवस उशिरा घेतले तरी कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.

- हेमंत कदम, अभियंता

Web Title: Even if the meter reading is taken a day late, it does not fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.