शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई करूनही ‘दे धक्का’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:42 IST

ठेकेदारांकडील बसचे ब्रेकडाऊन प्रमाण अधिक : चार महिन्यांत सव्वाचार कोटींचा दंड

पुणे : बे्रकडाऊन थांबण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून ठेकेदारांना जबर दंड केला जात असला, तरी ब्रेकडाऊन कमी झालेले नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत ठेकेदारांच्या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. तर, दुसरीकडे ‘पीएमपी’ मालकीच्या बसचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. बे्रकडाऊनसाठी ठेकदारांना मागील चार महिन्यांत सुमारे सव्वा चार कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही हे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे.

बे्रकडाऊन बसचे वाढते प्रमाणही पीएमपी प्रशासनासह वाहतूक पोलीस व पुणेकरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. मार्गावरच बस बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन वाहतुकीलाही अडथळा ठरतो. त्यामुळे अनेकदा मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ब्रेकडाऊन रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.पीएमपी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ठेकेदारांकडील बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात ठेकेदारांकडील २८२७ बस रस्त्यात बंद पडल्या होत्या. यंदा जुलै महिन्यात हा आकडा साडेतीन हजारांवर पोहोचला आहे. तर पीएमपीच्या मालकीच्या बसचे प्रमाण सुमारे २३०० एवढेआहे.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २ हजार बस असून, त्यापैकी ६५३ बस ठेकेदारांच्या आहेत. एकूण बसपैकी सध्या जवळपास ४०० ते ५०० बस दररोज मार्गावर येत नाहीत. त्यामध्ये जवळपास १७५ हून अधिक बस ठेकेदारांकडील आहेत. उर्वरित ४५० ते ४७५ बसपैकीही दररोज १०० हून अधिक बसमार्गातच बंद पडत असल्याने ‘पीएमपी’ची डोकेदुखी वाढली आहे. हे ब्रेकडाऊन रोखण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना सक्त ताकीद देऊन देखभाल-दुरूस्तीकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मागील चार महिन्यांत त्यांना सुमारे सव्वा चार कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पण त्यानंतरही हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे. मागील नोव्हेंबरपर्यंत २०० बस पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या बस नोव्हेंबर महिन्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आल्या.महिना पीएमपी बस पीपीपी भाडेतत्त्वावरील बस एकूण दैनंदिन सरासरीएप्रिल ३४७६ ४६६ २८१५ ६७५७ २२५मे ३०२३ ३८२ २००६ ५४११ १८०जून २७५५ ४४१ २१०९ ५३०५ १७६जुलै २८५० ५२१ २८२७ ६१९८ २०६

पीएमपी ब्रेकडाऊनची यावर्षीची स्थितीमहिना पीएमपी बस भाडेतत्त्वावरील बस एकूण दैनंदिन सरासरीएप्रिल ३२३३ २९५८ ६१९१ २०६मे २६२१ २७४२ ५३६३ १७८जून २०८१ २८५६ ४९३७ १६४जुलै २२९८ ३४९५ ५७९३ १९३ 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल