शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

चार महिन्यांनंतरही "विप्रो कोविड हाॅस्पिटल"पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अपयशच; राज्यसरकार व प्रशासनाचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 13:15 IST

रुग्णांना बेड मिळत नसताना ५०४ क्षमतेच्या विप्रो कोविड हाॅस्पिटलमध्ये केवळ १८० रुग्णांचे प्रवेश.. 

ठळक मुद्दे व्हेंटिलेटर धूळ खात पडून  इतर जिल्ह्यातील डाॅक्टर, नर्सवर विप्रो कोविड हाॅस्पिटलची भिस्त

सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : शहर आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करून एका महिन्यात दोन जम्बो कोविड हाॅस्पिटल उभ्या करणाऱ्या याच प्रशासनाला सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेले फुकटात उपलब्ध झालेले तब्बल ५०४ क्षमतेचे "विप्रो कोविड हाॅस्पिटल " चार महिन्यानंतरही पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. रुग्णांना बेड्स मिळण्यासाठी जीवाचा प्रचंड अटापीटा करावा लागत असताना निष्काळजी प्रशासनामुळे विप्रो हाॅस्पिटलमध्ये सध्या केवळ १८० रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. एवढेच नाही तर तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध नसल्याने येथील व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. 

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर अनेक खाजगी कंपन्या, संस्थांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेला मदत म्हणून अनेक कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. मुळशी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर विप्रो कंपनीने हिंजवडी येथे तब्बल ५०४ खाटांची सोय, १० आयसीयु बेड आणि ५ व्हेंटिलेटर असलेले अत्यंत सुसज्ज कोवीड कोविड हाॅस्पिटल सुरू केले. या कोविड हाॅस्पिटल चे ११ जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने या केंद्राचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले विप्रो कोविड हाॅस्पिटल एक महिन्यानंतर देखील सुरू नसल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते.विप्रो कंपनीकडून सर्व सोयीसुविधा निर्माण करुन हे हाॅस्पिटल जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिले. या आरोग्य आवश्यक असलेले मनुष्यबळ मात्र जिल्हा परिषदेने द्यायचे होते. परंतु केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्याने एक महिन्यांपासून सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेले रुग्णालय सुरु होऊ शकले नव्हते. त्यानंतर थेट पालकमंत्री अजित पवार यांनीच आदेश दिल्यानंतर तातडीने लातूर येथून काही डॉक्टर्स, नर्स मागावून हे हाॅस्पिटल सुरू करण्यात आले. सध्या हाॅस्पिटलमध्ये जागा शिल्लक नसल्याचे सांगत रुग्णांवर उपाचार टाळले जात आहे, तर एकीकडे कर्मचारी, डॉक्टर, नर्स नसल्याने सर्व सर्व सोयी सुविधा युक्त विप्रो कोविड हाॅस्पिटल रिकामे पडले आहे.------इतर जिल्ह्यातील डाॅक्टर, नर्सवर विप्रो कोविड हाॅस्पिटलची भिस्तजिल्हा परिषदेच्या वतीने विप्रो कोविड हाॅस्पिटल व अन्य हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी डाॅक्टर, नर्स, तज्ज्ञ डाॅक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी भरतीसाठी वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्याप ही डाॅक्टर, नर्स उपलब्ध झाले नाहीत. यामुळेच सध्या लातूर व अन्य जिल्ह्यातील डाॅक्टर, नर्सची सध्या विप्रो कोविड हाॅस्पिटल साठी आठ-नऊ दिवसांसाठी नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये आठ-आठ दिवसांसाठी चक्राकार पध्दतीने या नियुक्त्या केल्या जात असल्याने दर आठवड्याला नवीन येणाऱ्या डाॅक्टर, नर्सला रुग्णांची माहिती देणे , हाॅस्पिटल व्यवस्थापन समजण्यासाठीच तीन-चार दिवस जातात. यामुळे सध्या विप्रो कोविड हाॅस्पिटलची भिस्त अन्य जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले.-----पुढील काही दिवसांत पूर्ण क्षमतेने विप्रो कोविड हाॅस्पिटल सुरू करणार ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. तसेच सध्या जिल्ह्यातील सर्व हाॅटस्पाॅट गावांमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे पुढील पंधरा दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. या पार्श्‍वभूमीवरच मुळशी तालुक्यातील विप्रो कोविड हाॅस्पिटल येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन केले आहे. - सौरभ राव, विभागीय आयुक्त

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटल