युरोपीयन फिल्म फेस्टची मेजवानी
By admin | Published: June 3, 2017 02:49 AM2017-06-03T02:49:03+5:302017-06-03T02:49:03+5:30
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि युरोपीयन युनियनच्या वतीने येत्या ११ ते १७ जून दरम्यान युरोपीयन फिल्म फेस्टीव्हल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि युरोपीयन युनियनच्या वतीने येत्या ११ ते १७ जून दरम्यान युरोपीयन फिल्म फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला आहे. इस्टोनियाच्या ‘चेरी टोबॅको’ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होईल.
लॉ कॉलेजवरील एनएफएआयच्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. रविवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. इस्टोनियाचा चेरी टोबॅको हा चित्रपट दाखविण्यात येईल. तर, सोमवार दिनांक १२ जून रोजी माईमिक ‘मास्टरक्लास’मध्ये मार्गदर्शन करतील. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती या विषयांवर ते प्रकाश टाकतील.
हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मगदूम यांनी केले.
या महोत्सवात आॅस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, सायप्रस, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, लाटिव्हया, लक्झेम्बर्ग, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्पेन, स्वीडन अशा देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
आपण सर्व एक कुटुंबच असून, त्याला कला आणि चित्रपट देखील अपवाद नाहीत, हे या माध्यमातून येथील रसिकांना नक्कीच अनुभवायला मिळेल. हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
- तोमाझ कोझलोवस्की, राजदूत,
युरोपीयन युनियनचे