शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

पुण्यातील ‘विलंब’मध्ये तरुणाईला मिळाली नि:शब्दतेची अनुभूती; युरोपियन कलाकार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:50 IST

सहजयोग ध्यान केंद्रातर्फे ‘विलंब’ हा युरोपियन साधकांचा बँंड् हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. यातील पुणे भेटीदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात बँडमधील सहा कलाकारांनी आपल्या अभूतपूर्व कलाविष्काराचे दर्शन रसिकांना घडविले. 

ठळक मुद्दे‘लँंड आॅफ प्युरिटी’ या गीताने करण्यात आले भारतीय भूमीला वंदनपुण्यात येऊन हे संगीत ऐकविण्यात आम्हाला नेहमीच आनंद वाटतो : फिनबर अन्स्लो

पुणे : पारंपरिक सुरांच्या साथीला आधुनिक वाद्यांची मिळालेली जोड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन व ड्रम या वाद्यांच्या सूर आणि नादाच्या अद्वितीय मिलाफातून आसमंतात उमटलेले तरंग, पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा साधला गेलेला अद्वितीय असा मेळ... अशा चैतन्यमयी आविष्कारामधून विचारांच्या पलीकडील नि:शब्दतेची अनुभूती तरुणाईला मिळाली. सहजयोग ध्यान केंद्रातर्फे ‘विलंब’ हा युरोपियन साधकांचा बँंड् हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. यातील पुणे भेटीदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात बँडमधील सहा कलाकारांनी आपल्या अभूतपूर्व कलाविष्काराचे दर्शन रसिकांना घडविले. ‘अनुभव, कृती, परिवर्तन’ या संकल्पनेच्या माध्यमातून सहजयोग आत्मसाक्षात्काराची माहिती आणि अनुभव त्यांनी दिला. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक बी. मीनाक्षी सुरेश, केंद्राचे समन्वयक चंद्रकांत देवडा, रितेश बिरारी, डॉ. विश्वजित चव्हाण आदी उपस्थित होते. फिनबर अन्स्लो, ग्वेंडालीन अन्स्लो, क्लाऊडीओ मेरिको, सिल्विया बिर्नेटी, लुका यांनी वादन आणि गायनातून तरुणाईला खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरतीने झाली. त्यानंतर ‘लँंड आॅफ प्युरिटी’ या गीताने भारतीय भूमीला वंदन करण्यात आले. ’कमिंग डाऊन फ्रॉम द माऊंटन’ या गाण्यातून आपल्यातील अहंकार दूर करण्याचा संदेश देण्यात आला. ‘ईस्ट और वेस्ट’ या गाण्याने पूर्व आणि पश्चिम असो सर्वत्र आनंद एकच असतो असे सांगितले आणि या गाण्यावर तरूणाईची पावले थिरकली. ग्वेंडोलीन अन्स्लो हिने सहजयोग आणि श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कार्याची माहिती दिली. या स्वरमयी मैफिलीने युवा पिढीची सायंकाळ अविस्मरणीय ठरली.

संस्कृत भाषेमध्ये दोन विचारांमधील अंतराला विलंब असे म्हटले गेले आहे. ही निर्विचार अवस्था तरुणांना सर्व मानसिक ताणाच्या पलीकडे घेऊन जाते. संगीत हे त्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. पुण्यात येऊन हे संगीत ऐकविण्यात आम्हाला नेहमीच आनंद वाटतो.- फिनबर अन्स्लो

टॅग्स :fergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालयPuneपुणे