प्रमुख मंडळांची प्राणप्रतिष्ठापना (बातमी जोड)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:01+5:302021-09-11T04:13:01+5:30

सजावटीवर फारसा खर्च न करता साधेपणानेच उत्सव साजरा करण्यावर अखिल मंडई गणपती मंडळाने भर दिला आहे. सनई-चौघड्याच्या मंगलमयी सुरांनी ...

Establishment of major circles (news link) | प्रमुख मंडळांची प्राणप्रतिष्ठापना (बातमी जोड)

प्रमुख मंडळांची प्राणप्रतिष्ठापना (बातमी जोड)

सजावटीवर फारसा खर्च न करता साधेपणानेच उत्सव साजरा करण्यावर अखिल मंडई गणपती मंडळाने भर दिला आहे. सनई-चौघड्याच्या मंगलमयी सुरांनी वातावरणात रंग भरले. मंडळाच्या ‘श्रीं’ची दुपारी बारा वाजता विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि त्यांच्या पत्नी मीना भोंडवे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. सूर्याच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. न्यू गंधर्व बँडच्या पथकाने बँड वादन सादर केले.

आॅनलाइन दर्शनसाठी - www.akhilmandaimandal.org

------------------------------------------------------------------------

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट :

ट्रस्टच्या श्रींची गुरुजी तालीम मंडळांचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या वादनामुळे निर्माण झालेल्या मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला. मंडळाने रंगीबेरंगी काचांच्या साहाय्याने केलेली आकर्षक आरास बाप्पा भोवती केली आहे.

आॅनलाइन दर्शनसाठी -www.bhaurangari.com

-------------------------------

Web Title: Establishment of major circles (news link)