शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

महिला व्यवसाय प्रशिक्षणातील अनुदान गैरव्यवहार तपासणीसाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:23 IST

खेड तालुक्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला व्यवसाय प्रशिक्षणातील अनुदान गैरव्यवहाराची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली

पाईट : खेड तालुक्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला व्यवसाय प्रशिक्षणातील अनुदान गैरव्यवहाराची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून समितीने पाईट व अंबोली प्रशिक्षण केंद्रातील महिलांकडे चौकशी केली. या वेळीही यापूर्वीच्या चौकशी समितीसमोर आलेला अनुभव पुन्हा अनुभवायला मिळाल्याने खुद्द प्रशिक्षणार्थी महिलांच्या लेखी जबाबामुळे व्यवसाय प्रशिक्षण गैरव्यवहार प्रकरणी गांभीर वळण मिळणार आहे.खेड तालुक्यातील १४ गावांमधील ५९५ महिलांच्या शिवणकाम, फॅशन डिझायनिंग व ब्यूटी पार्लरच्या व्यावसायिक प्रशिक्षणापोटी पंचायत समितीने पंचायत समिती उपकर निधीतून सुमारे २५ लाख रुपयांचे अनुदान पुण्यातील ३ संस्थांना अदा केले आहे. यात बोगस प्रशिक्षणार्थी दाखवून अनुदान लाटल्याची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर व सदस्य अंकुश राक्षे यांनी पंचायत समितीच्या जुलै महिन्याच्या मासिक बैठकीत उपस्थित करीत या प्रशिक्षणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.यावर पंचायत समिती स्तरावर संबंधित गावाचे ग्रामसेवक, सरपंच व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीची चौकशी ३ महिने उलटून गेले तरी पूर्ण होत नव्हती. ज्या ग्रामसेवकांनी ‘प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले’ असे दाखले दिले, त्यांनाच चौकशी समितीत स्थान दिल्याने चौकशीची फेरचौकशी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, सहायक मुख्य लेखा व वित्त आधिकारी चव्हाण, झंझणे, विस्तार अधिकारी अनिल लोंढे, नामदेव बांगर आदींच्या चौकशी समितीने पाईट व अंबोली येथील महिलांशी संवाद साधला. या वेळी त्या ठिकाणचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.खोट्या सह्या केल्याचा आरोपआंबोली, पाईट येथील लाभार्थी महिला प्रशिक्षणार्थींची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी उपस्थित लाभार्थी महिलांचे लेखी जबाब घेतले. या वेळी संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. फक्त पाच ते सहा महिला हजर असायच्या, दोन तास शिकवायचे, फक्त दोन ते तीन शिलाई मशीन होत्या, असे अनेक मुद्दे महिलांनी सांगितले. काही महिलांनी ‘हजेरी पुस्तकातील सह्या आमच्या नाहीत, सह्या खोट्या आहेत, कोणाचीही परीक्षा घेतली नाही, प्रमाणपत्र दिले नाही,’ असे लेखी स्वरूपात दिले. सहा महिने झाले तरी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर चौकशी सुरू असून महिला प्रशिक्षण व अनुदान गैरव्यवहाराला गंभीर वळण लागले आहे.यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याऐवजी वारंवार वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जावे लागत असल्याने माहिलांमध्ये नाराजीचा सूर असून प्रशिक्षणासाठी नाव देऊन नसती आफत आल्याची भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :Puneपुणे