शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण म्हणजे शब्दांचे बुडबुडे; पुणे महापालिकेतील सभेस आयुक्तांसह अधिकाऱ्यांची पाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:07 IST

पुणे शहराच्या पर्यावरण अहवालावर आयोजित सर्वसाधारण सभेत केवळ शब्दांचे बुडबुडे फुटले. आयुक्तांसह बहुसंख्य अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली.

ठळक मुद्देआयुक्तांसह बहुसंख्य अधिकाऱ्यांनी सभेकडे फिरवली पाठशहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत : माधुरी सहस्त्रबुद्धे

पुणे: शहराच्या पर्यावरण अहवालावर आयोजित सर्वसाधारण सभेत केवळ शब्दांचे बुडबुडे फुटले. आयुक्तांसह बहुसंख्य अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली.महापौर मुक्ता टिळक यांनी साडेअकरा वाजता सभेचे कामकाज सुरू केले. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गंभीर विषय आहे, त्यावर सर्वांना बोलू द्यावे असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना सूचवले. त्यांनी विषय आज मंजूर करायचा आहे, वेळ होईल. आमचे आठ तुमचे तीन काँग्रेसचे दोन असे करू म्हणून सांगितले. तुपे यांनी ते अमान्य करत तुमच्याच लोकांना बोलू द्या आम्ही कोणीच बोलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर सुरूवात ज्योत्स्ना एकबोटे यांनी केली. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शहरात विविध आजारांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या भाषणानंतर गोपाळ चिंतल यांनी तब्बल तासभर बोलंदाजी केली. पंतप्रधानांपासून शहरातील आमदारांपर्यत अनेकांची नावे घेत त्यांनी भाजपाचे गुणगान केले. कंटाळलेल्या सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी भाषण सुरूच ठेवले. अधिकाऱ्यांवर टीका करत त्यांनी महापौरांनी स्मार्ट सिटी व महापालिकेत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा असे सांगितले. माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी काही अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करत शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहनांच्या हॉर्नला लगाम घालण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या. मेट्रोचे काम सुरू असताना कर्वे रस्त्यावरील वाहतूक व पर्यावरण यांची वाट लागणार असल्याने त्याचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली.

शहराध्यक्षांची सभेला हजेरीभाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. पत्रकार गॅलरीत येऊन ते सर्व सदस्यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकत होते. त्यामुळे भाजपाच्या नव्या सदस्यांमध्ये बोलण्याची अहमहिका लागली होती. अनेक सदस्यांनी जवळच्या पत्रकार मित्रांना फोन करून बोलण्यासाठी मुद्दे घेतले. महापौर व सभागृह नेते भिमाले यांच्याकडे भाषण करण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाChetan Tupeचेतन तुपेMukta Tilakमुक्ता टिळकShrinath Bhimaleश्रीनाथ भिमाले