त्यामुळे उद्योगांचे सर्व आर्थिक गणित चुकत आहे, त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी होणार विलंब त्यातच महावितरणकडून विजेच्या बिलासाठीचा तगादा लावला जात आहे. विलंब शुल्क वसूल केले जात आहे. मात्र अनेक वेळा निवेदन देऊन चर्चा करूनही महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. या कारणास्तव महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे खेड शिवापूर परिसरात असलेल्या भोर व हवेली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेवटी औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत वेळू (ता. भोर) येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
आज खेड शिवापूर परिसरातील उद्योजकांनी वेळू येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरण चे कनिष्ठ उपअभियंता विजयकुमार माने यांना दिले.
--
चौकट
--
महावितरण कडून गेले तीन वर्षांपासून विज पुरवठा सुरळीत करण्या करता फक्त पोकळ आश्वासन दिले जात आहे रोज दोन ते तीन तास विजेचा लपंडाव चालू असतो वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे
- अतुल साखपरे (चंदाराणी इंडस्ट्रीज)
--
पावसाळ्या मुळे मुख्य वीज वाहिनीच्या दुरुस्ती च्या कामात अडचण येत आहे पण येत्या काही दिवसात काम पूर्ण करून आम्ही वीजपुरवठा सुरळीतपणे देऊ
- शैलेशकुमार गीते (उपकार्यकरी अभियंता महावितरण नसरापूर)