पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने बोर्ड कार्यालय आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली व सकाळी ८.३० वा रक्षा मंत्रालयाचे मुख्य निर्देशक अजय शर्मा, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग,नगरसेवक अतुल गायकवाड, आदींनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, शशीधर पुरम, महेश पुंडे, तुषार पाटील, कुंभार बावडी भाजीविक्रेता संघ, फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानचे मिलिंद अहिरे,सिद्धार्थ तरुण मंडळ, निहाल कदम, नवीन भोसले, सुमित शेलार यांनी पुष्पहार अर्पण केला, भीम सेवा समाज नवा मोदिखाना,अक्षय गायकवाड, मुकेश काळे,संदीप धांडोरे,रवींद्र कांबळे, हिंद तरुण मंडळा, आदींनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.