शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लुटा सुखद प्रवासाचा आनंद; नव्या रुपात धावणार पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:19 IST

पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सुरू असलेली शताब्दी एक्सप्रेस येत्या २५ डिसेंबरपासून नव्या रुपात धावणार आहे. पुणे विभागाच्या ‘प्रोजेक्ट स्वर्ण’अंतर्गत या गाडीच्या दहा डब्ब्यांची अंतरबाह्य सजावट करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशताब्दीला करण्यात आले पी. यू. पेंटिंग, आकर्षक ग्रेफाईट कोटींगगाडीमध्ये सुगंधी वातावरण राहण्यासाठी बसविण्यात आली विशेष यंत्रणा

पुणे : पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सुरू असलेली शताब्दी एक्सप्रेस येत्या २५ डिसेंबरपासून नव्या रुपात धावणार आहे. पुणे विभागाच्या ‘प्रोजेक्ट स्वर्ण’अंतर्गत या गाडीच्या दहा डब्ब्यांची अंतरबाह्य सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखद आणि मनमोहक प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पी. यू. पेंटिंग करण्यात आले असून गाडीला आकर्षक ग्रेफाईट कोटींग करण्यात आले आहे. तसेच ही गाडी धूळ विरहीत असणार आहे. गाडीच्या सजावटीमुळे व आकर्षक बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. पुणे स्टेशन येथून खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते पहाटे ५. ५० वाजता गाडीचा शुभारंभ होणार आहे. गाडीची बैठक व्यवस्था सुरेख व नावीन्यपूर्ण असून नवीन डब्यांमध्ये रेड कारपेट अंथरले आहे. त्याचप्रमाणे गाडीमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या संस्कृतीचे व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या आर्कषक पेंटिंग लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडीमध्ये सुगंधी वातावरण राहण्यासाठी विशेष यंत्रणा बसविण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसिविले आहेत.दृष्टीहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये बैठक क्रमांकाची व्यवस्था केली असून नवीन मोबाईल चार्जर, आकर्षक परडे, एलईडी रिडिंग लॅम्प आणि डिजिटल घड्याळ लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी उच्च श्रेणी वर्ग प्रवाशी डब्यांमध्ये वायफाय व्यवस्था बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधांची माहिती देणारा सूचना फलक लावण्यात आला आहे.पुण्यातून सिकंदराबाद येथे धावणारी शताब्दी एक्सप्रेस पुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणार असून सिकंदराबाद येथे २ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे. तसेच सिकंदराबाद येथून २ वाजून ४५ मिनिटांनी सुटून पुण्यात ११ वाजून १० मिनिटांनी पोहचेल, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी