शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूला धास्ती ‘प्रचंड’ची, पुण्यातील एआरडीईतर्फे निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:40 IST

पुणे : युद्धात शत्रूचा वेग कमी करण्यात भूसुरुंग महत्त्वाची भूमिका बजावतात.

निनाद देशमुख पुणे : युद्धात शत्रूचा वेग कमी करण्यात भूसुरुंग महत्त्वाची भूमिका बजावतात. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅल्बिशमेंटतर्फे ‘प्रचंड’ नामक स्मार्ट भूसुरुंग विकसित करण्यात आले असून, त्यामुळे शत्रूच्या रणगाड्यांचा अचूक वेध घेणे शक्य होणार आहे. सध्या या भूसुरुंगाच्या चाचण्या सुरू असून, लवकरच ते लष्कराला सुपुर्र्द करण्यात येणार आहेत.शत्रूच्या सीमेमध्ये वेगाने शिरण्यासाठी रणगाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. या रणगाड्यांना वेळीच रोखणे महत्त्वाचे असते. यासाठी रणगाडाविरोधी भूसुरुंग महत्त्वाचे असतात. रणगाडा या भूसुरुंगावरून गेल्यावर त्याच्या वजनाने स्फोट व्हायचा. यात प्रत्येक वेळेला स्फोट होईलच, याची श्वाश्वती नसल्याने लष्करातर्फे स्मार्ट भूसुरुंगाच्या निर्मितीची मागणी झाली होती. त्यानुसार, पुण्यातील एआरडीईने अदृश्य मार्क २ हे भूसुरुंग बनविले होते. मात्र, आधुनिक भूसुरुंगाची मागणी करण्यात आली. त्यानुसार, ‘प्रचंड’ या भूसुरुंगाचा निर्मिती करण्यात येत आहे.‘प्रचंड’मध्ये मॅग्नेटिक आणि सीएटींक सेन्सर बसविण्यात आले आहे. यामुळे या भूसुरुंगावरून गेलेल्या वाहनांचे वर्गीकरण या भूसुरुंगाला करता येणार आहे. रणगाडा असल्यास सेंकदाच्या आत त्यांचा स्फोट होऊन शत्रूचा रणगाडा पूर्णपणे निकामी करता येणार आहे. अभेद्य रणगाड्याला भेदण्याची क्षमता या भूसुरुंगातील स्फोटकांमध्ये आहे. रिमोटद्वारेसुद्धा याचे नियंत्रण करता येते.जमिनीखाली १५ सेंटिमीटर हे सुरुंग पेरण्यात येतात. शत्रूने जमीन नांगरून तसेच अवजड भूसुरुंगविरोधी वाहनांद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला, तरी हे भूसुरुंग शोधता येत नाहीत. यातील अति उच्च दर्जाच्या सेन्सरमुळे हे शक्य झाले आहे. यातील सर्व यंत्रणा भारतीय बनावटीची आहे.प्रंचडमध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे जीपीएस प्रणालीद्वारे ते पेरल्यानंतर त्याचा शोध घेता येणे शक्य आहे़ हे स्फोटक ९० दिवस जमिनीखाली राहू शकते़>पुनर्वापर शक्यप्रचंडमध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे जीपीएस प्रणालीद्वारे ते पेरल्यानंतर त्याचा शोध घेता येणे शक्य आहे. याचबरोबर ट्रान्समीटरद्वारे ते निकामी करून पुन्हा त्यांचा वापर करता येणे शक्य आहे. हे स्फोटक ९० दिवस जमिनीखाली राहू शकते.फ्रान्समध्ये एचपीपीएफ २ हे आधुनिक भूसुरुंग विकसित करण्यात आले आहे. प्रचंड त्याहीपेक्षा अधिक सक्षम आहे. दोन्ही भूसुरुंगांच्या चाचण्या एआरडीईतर्फे करण्यात आल्या असून, त्यात प्रचंड भूसुरुंग अधिक शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. आणखी काही चाचण्या पूर्ण झाल्यावर ते लष्करला देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे