कुकडी नदीतील अतिक्रमण अखेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:23 AM2018-06-23T01:23:09+5:302018-06-23T01:23:12+5:30

कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.

At the end of the encroachment of the cucumber river | कुकडी नदीतील अतिक्रमण अखेर काढले

कुकडी नदीतील अतिक्रमण अखेर काढले

googlenewsNext

टाकळीहाजी : कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. गेल्या महिनाभरात निघोज, कुंड (ता. पारनेर), होणेवाडी, टाकळीहाजी (ता. शिरूर) या परिसरातील शेतकºयांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी दोन वेळा आंदोलन केले होते. मात्र, यातूनही या प्रश्नाला न्याय मिळत नसल्याने संदीप पाटील फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचे शिष्टमंडळ राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटले. विखे पाटील यांनी कुकडीच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमण काढण्यावर अधिकारी सक्रिय झाले. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली.
तीन वर्षांपासून सहाशे हेक्टरपेक्षा जास्त पाण्याची मागणी करून रीतसर पाणीपट्टी भरून हे पाणी आम्ही घेत होतो. कुकडीच्या नियमानुसार हे पाणी रीतसर असल्याचा दावा मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर (ता. पारनेर), तसेच भाकरेवाडी व माळवाडी (ता. शिरूर) या भागातील शेतकरी करीत होते. मात्र, हे पाणी अनधिकृतपणे घेतल्याने ते मिळत नसल्याचा आरोप करून निघोज, कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागातील शेतकºयांनी पाईपच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, आंदोलन करूनही प्रशासन याची दखल घेत नव्हते. महिनाभरात कुंड व टाकळीहाजीच्या शेतकºयांनी दोन वेळा यासाठी आंदोलन केले. सचिन वराळ, मंगेश वराळ यांच्या नेतृत्वाखाली पाचशे शेतकºयांनी पहिल्यांदा ३१ तासांचा बैठा सत्याग्रह केला. त्यावेळी कुकडीच्या उपकार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी हे पाईप काढण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
मात्र राजकीय दबाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नाही, ही सबब सांगून कुकडी अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी पळवाट पाहिली. मात्र त्यानंतर पुन्हा आठ दिवसांच्या अंतराने शेतकºयांनी तीन दिवसांचे उपोषण करीत शिष्टमंडळ विखे-पाटील यांच्याकडे नेल्यानंतर अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी तयार झाले व त्यानंतर कार्यवाही आज सुरू केली.
> सध्या तीन पाईप काढण्यात आले असून उर्वरित पाईप लवकर काढण्यात येणार आहेत. या तीन पाईपमुळे पाणी वळवण्याचा मार्ग खुंटला असून कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागांतील शेतकºयांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: At the end of the encroachment of the cucumber river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.